Monday, June 24, 2024

ओटीटीवर ३ डिसेंबरला होणार धमाल; ‘बॉब बिस्वास’पासून ‘मनी हाईस्ट’पर्यंत ‘या’ वेबसीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीला

ओटीटी प्लॅटफॉर्म आता दर आठवड्याला त्यांच्या प्रेक्षकांसाठी नवीन आणि जोरदार मसाला घेऊन येत आहेत. यात सनसनाटी कथांपासून ते नव्या युगातील सामग्रीचा समावेश आहे. या आठवड्यातही काही मालिकांचे पुढील भाग नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि झी ५ वर पाहायला मिळतील. तर काही नवीन चित्रपट देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. अशाप्रकारे ३ डिसेंबर रोजी ओटीटीवर कंटेंटचा वर्षाव होणार आहे, ज्यामध्ये ‘मनी हाईस्ट सीझन ५’ आहे, त्यासोबत दोन उत्कृष्ट चित्रपट देखील आहेत, ज्यामध्ये अगदी नवीन कंटेंट दिसेल.

मनी हाईस्ट ५
‘मनी हाईस्ट’चा अंतिम सीझन येत्या शुक्रवारी (३ डिसेंबर) नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या या स्पॅनिश वेब सीरिजच्या पाचव्या सीझनचा हा दुसरा भाग आहे. या सीरिजमध्ये उर्सुला कॉर्बेरो, अल्वारो मॉर्टे, इत्झियर इटुनो, पेड्रो अलोन्सो, मिगुएल हेरन, जैमे लोरेन्टे, एस्थर एसेबो हे कलाकार दिसणार आहेत. चाहत्यांचा उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की, अंतिम शोमध्ये प्राध्यापक आणि टीमचे काय होणार आणि चोरीला गेलेल्या सोन्याचे काय होणार? आता सर्वांच्या नजरा त्याच्या शेवटाकडे लागल्या आहेत.

इनसाइड एज ३
विवेक ओबेरॉय आणि रिचा चढ्ढा अभिनित सीरिज ‘इनसाइड एज ३’ ऍमेझॉन प्राईम व्हिडिओचे दार ठोठावणार आहे. ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर सीरिजचे पहिले दोन भाग आले आहेत, ज्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. आता सर्वजण तिसर्‍या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘मनी हाईस्ट ५’ शी स्पर्धा करेल. ही सीरिज येत्या शुक्रवारी (३ डिसेंबर) प्रदर्शित होणार आहे.

डीकपल्ड
‘डीकपल्ड’ ही सीरिज नेटफ्लिक्सवर येत्या शुक्रवारी (३ डिसेंबर) प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये आर माधवन आणि सुरवीन चावला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत, ज्यामध्ये पती-पत्नीची कथा पाहायला मिळणार आहे.

बॉस बिस्वास
अभिनेता अभिषेक बच्चनचा ‘बॉस बिस्वास’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी (३ डिसेंबर) झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. ‘बॉस बिस्वास’ हे सुजॉय घोषच्या २०१२ मध्ये आलेल्या ‘कहानी’ चित्रपटातील एका पात्राचे नाव होते.

ज्यामध्ये अभिनेता शाश्वत चॅटर्जी बॉब या एलआयसी एजंटच्या भूमिकेत दिसला होता, जो भाड्याने खून करायचा. आता या चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातील त्याची भूमिका खूपच वेगळी आहे. त्याच्या चित्रपट आणि लूककडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जय गंगाजल’च्या ‘त्या’ सीननंतर ढसाढसा रडू लागली होती प्रियांका चोप्रा, मग अभिनेत्याने…

-बोनी कपूर यांची इंस्टाग्रामवर एन्ट्री, मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी इंस्टावर आल्याचे अर्जुन कपूरने म्हणणे

-पोलिस म्हणून सलमान खानला आवडते ‘ही’ खास व्यक्ती; अभिनेत्याने सांगितले काही किस्से

हे देखील वाचा