आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, बॉलिवूड आणि क्रिकेटचं फार जुनं नातं आहे. क्रिकेटपटू आणि अभिनेत्रींमधील अफेअर काही नवीन नाहीत. असे बरेच खेळाडू आहेत, ज्यांचे अभिनेत्रींवर प्रेम होते. तसेच अनेकांचे प्रेमप्रकरण तर थेट लग्नापर्यंत पोहोचले होते. अशीच एक कहाणी आहे एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा आणि पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान तसेच माजी क्रिकेट कर्णधार इमरान खान यांची.
खरं तर इंस्टाग्रामवर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका वृत्तपत्राचे कात्रण दिसत आहे. हा फोटो सन १९८५ मधील स्टार वृत्तपत्राचा आहे. ज्यामध्ये रेखा आणि इमरान खान यांचा फोटो दिसत आहे. यासोबतच लेखाची हेडलाईन त्यांच्या लग्नाशी संबंधित आहे.
यामध्ये स्पष्टपणे लिहिलेले दिसते की, ‘रेखा आणि इमरान ताहिर लग्न करतील?’ यात भारतीय चित्रपट जर्नलच्या हवाल्याने दोघांच्याही लग्नाबाबतचा खुलासा केला गेला आहे. यानुसार, रेखा यांच्या आई या नात्याने खूपच खुश होत्या. इतकेच नाही, तर त्यांनी यासाठी ज्योतिषीची भेट घेऊन कुंडलीही दाखवली होती. याव्यतिरिक्त असेही लिहिले आहे की, इमरान खान यांनी रेखासोबत मुंबईत काही काळ घालवला होता. दोघांनाही लोकांनी अनेकदा मुंबईतील बीचवर आणि नाईटक्लबमध्ये एकत्र पाहिले होते. त्यावेळी लोकांचे असे म्हणणे होते की, ते दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते आणि प्रेमात पडताना दिसत होते.
या लेखात एक हैराण करणारी गोष्टही लिहिली होती. ज्यामध्ये इमरान यांनी एकेवेळी म्हटले होते की, “थोड्या काळासाठी या अभिनेत्रींसोबत राहिले जाऊ शकते. मलाही काही काळासाठी त्यांच्यासोबत राहायला आवडते आणि मग मी पुढे निघून जातो. मी कोणत्याही अभिनेत्रीसोबत लग्न करू शकत नाही.” याव्यतिरिक्त या लेखानुसार, इमरान खान यांचे झीनत अमान आणि शबाना आझमी यांच्याशीही नाते होते.
https://www.instagram.com/p/CGmZwmRnAr3/?utm_source=ig_web_copy_link
विशेष म्हणजे, इमरान खान यांनी सन १९९५ मध्ये ब्रिटिश निर्मात्या जेमिमा गोल्डस्मिथ यांच्याशी लग्न केले होते. तरीही सन २००४ मध्ये हे लग्न संपुष्टात आले. त्यानंतर त्यांनी सन २०१४ मध्ये ब्रिटिश पत्रकार रेहम खान यांच्यासोबत लग्न केले. परंतु हे नातेही एक वर्षच टिकू शकले आणि दोघांनीही घटस्फोट घेतला. इमरान यांनी सन २०१८ मध्ये तिसऱ्यांदा लग्न केले, जे आजपर्यंत कायम आहे. त्यांच्या तिसऱ्या पत्नीचे नाव बुशरा बीबी असे आहे.
दुसरीकडे रेखा यांनी सन १९९० मध्ये दिल्लीचे व्यावसायिक मुकेश अगरवाल यांच्यासोबत लग्न केले होते. मात्र, लग्नाच्या काही महिन्यानंतर त्यांच्या पतीने आत्महत्या केली होती. तेव्हापासून रेखा या एकट्याच आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-राधे चित्रपटातील किसींग सीनबाबत दिशा पटानीचा मोठा खुलासा, म्हणाली…