Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड इम्रान खान यांनीही केले मान्य, पाकिस्तानी फिल्ममेकर करतात बॉलिवूडचा कंटेंट चोरी; दिला ‘हा’ सल्ला

इम्रान खान यांनीही केले मान्य, पाकिस्तानी फिल्ममेकर करतात बॉलिवूडचा कंटेंट चोरी; दिला ‘हा’ सल्ला

भारतावर नेहमीच निशाणा साधणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता बॉलिवूडबाबत वक्तव्य केले आहे. बॉलिवूडचा उल्लेख करताना त्यांनी त्यांच्या म्हणजेच पाकिस्तानी चित्रपट निर्मात्यांवर देखील निशाणा साधला आहे. इम्रान खान यांचे असे म्हणणे आहे की, पाकिस्तानी चित्रपट निर्माते बॉलिवूड किंवा इतर फिल्म इंडस्ट्रीला कॉपी करतात. त्यांच्याकडे स्वतःचा असा काहीच नवीन आणि वेगळा कंटेंट नाहीये. (Pakistan prime minister imran Khan advised film makers to create original content instead of imitating bollywood)

इम्रान खान यांनी पाकिस्तानी चित्रपट निर्मात्यांना बॉलिवूडला कॉपी करण्याऐवजी त्यांचा स्वतःचा काहीतरी नवीन कंटेंट निर्माण करण्याचा आग्रह केला आहे. ही गोष्ट त्यांनी इस्लामाबादमध्ये आयोजित केलेल्या एका शॉर्ट फिल्म कार्यक्रमात सांगितली.

इम्रान खान यांनी सांगितले की, “सुरुवातीला काही चुका झाल्या आहेत, कारण पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री ही बॉलिवूडने प्रभावित झाली होती. या सगळ्याचा परिणाम असा झाला की, एक अशी संस्कृती बनली आहे, जी दुसऱ्या राष्ट्रातील संस्कृतीची कॉपी करते आणि त्यांच्याच प्रथा पुढे चालवते. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मी आज युवा चित्रपट निर्मात्यांना सांगू इच्छितो की, माझ्या अनुभवानुसार केवळ ओरिजनल गोष्ट विकली जात असते. डुप्लिकेटला काहीच मूल्य नसते.”

माध्यमातील वृत्तानुसार, इम्रान खान यांनी या गोष्टींवर देखील भर दिला की, पाकिस्तानी चित्रपट निर्मात्यांनी आता जरा वेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे. जेणेकरून ओरिजनल कंटेंट बनवू शकतात. त्यांनी सर्व पाकिस्तानी चित्रपट निर्मात्यांना सांगितले आहे की, पुढे या आणि आता या दिशेने विचार करा.

पाकिस्तानी संस्कृतीमध्ये हॉलिवूड आणि बॉलिवूडचा होणारा परिणाम सांगत ते म्हणाले की, “देशातील लोक तोपर्यंत लोकल कंटेंट बघत नाहीत, जोपर्यंत त्याला व्यावसायिक दिशा मिळत नाही. माझा असा सल्ला आहे की, युवा चित्रपट निर्मात्यांना त्यांचा मूळ विचार पुढे आणण्याची गरज आहे. माझ्या जीवनाचा हा अनुभव आहे जो हरण्याला घाबरतो तो कधीच जिंकू शकत नाही.”

इम्रान खान यांच्या या वक्तव्यानंतर हे समजते की, त्यांनी या गोष्टीचा स्वीकार केला हे की, पाकिस्तानी चित्रपट निर्माते बॉलिवूडला कॉपी करतात. मागील अनेक वर्षांपासून पाकिस्तानी आणि भारतातील सोशल मीडिया युजरमध्ये एक वाद चालला आहे. दोघेही एकमेकांवर त्यांचे चित्रपट आणि गाणी चोरी करत असल्याचा आरोप लावत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आनंदाची बातमी! ‘खिलाडी’ अक्षय कुमारने केली नवीन मोबाईल गेमची घोषणा; सोशल मीडियावरून दिली माहिती

-‘ओ पिया’, म्हणत ‘शालू’ने शेअर केला व्हिडिओ; काळ्या साडीमध्ये पाहायला मिळाल्या वेड लावणाऱ्या अदा

-हॉट व्हिडिओ शेअर करत मराठमोळी ऋतुजा बागवे म्हणतेय, ‘…माझ्यात तो टॅलेंट नाही’

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा