Saturday, March 2, 2024

‘फुकरे 3’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड; जाणून घ्या 20 दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

फुकरे’ आणि ‘ फुकरे 3 रिटर्न्स’च्या सुपर यशानंतर मृगदीप सिंग लांबाच्या ‘फुकरे 3’ने बॉक्स ऑफिसवरही तुफान कमाई केली आहे आणि प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. 28 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला विवेक अग्निहोत्रीच्या द वॅक्सीन वॉर आणि कंगना राणौतच्या चंद्रमुखी 2 या चित्रपटांना थिएटरमध्ये टक्कर द्यावी लागली. या चित्रपटाला शाहरुख खान स्टारर जवान या चित्रपटाचीही स्पर्धा लागली आहे, असे असूनही ‘ फुकरे 3’ बॉक्स ऑफिसवर या सर्व चित्रपटांना मागे टाकत आहे.

लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझीचा भाग असलेल्या फुकरे 3 ने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला आहे. चित्रपटाने रिलीजच्या 20 व्या दिवशी 90 लाखांची कमाई केली आहे. यामुळे चित्रपटाची एकूण कमाई 92 कोटींच्या पुढे गेली आहे. फुकरे 3 ने 19 व्या दिवशी 1.1 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे 20 व्या दिवशी कमाईत काहीशी घट झाली आहे. मात्र, चित्रपटाला अजूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

फुकरे 3 मध्ये अली फजल, पुलकिता जोशी, ऋचा चड्ढा, मनजोत सिंह आणि वरुण शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन मुदस्सर अजीज यांनी केले आहे. फुकरे 3 च्या यशामुळे निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चित्रपटाच्या यशामुळे फ्रँचायझीचा चौथा भाग करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

फुकरे 3ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 8.82 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. यानंतर चित्रपटाने ओपनिंग वीकेंडला 43.38 कोटींचा व्यवसाय केला. फुकरे 3 हा कमी बजेटचा चित्रपट आहे. स्टार कास्टमध्ये कोणत्याही महागड्या सुपरस्टार्सचा समावेश नव्हता. अशा परिस्थितीत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली.

फुकरे 3च्या आठवड्याच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने 60 कोटींहून अधिक कमाई केली होती. त्याचवेळी दुसऱ्या आठवड्यात 81.29 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. आता लेटेस्ट बिझनेसबद्दल बोलायचे झाले तर 16 ऑक्टोबरला चित्रपटाने 75 लाखांची कमाई केली. चित्रपटाने 17 ऑक्टोबर रोजी 70 लाखांचा व्यवसाय केला आहे. (Fukrey 3 earned 90 lakhs on day 20 at the box office)

आधिक वाचा-
प्रसाद ओकने स्वप्नील जोशीला दिल्या हटके अंदाजात शुभेच्छा; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
‘चलेया’ गाण्याची अजिंक्य राऊतला भुरळ, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केले एक्सप्रेशनचे कौतुक

हे देखील वाचा