Monday, July 15, 2024

‘कच्चा बादाम’चे पाकिस्तानी व्हर्जन ‘रोजा रखूंगा’ ऐकून भडकले युजर्स; म्हणाले, ‘रमजानच्या पवित्र महिन्यात…’

काही दिवसांपूर्वी शेंगदाणे विक्रेता गायक भुबन बादायकर (Bhuban Badaykar) याचे ‘कच्चा बादाम’ हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते. अशातच आता त्याचे पाकिस्तानी व्हर्जनही समोर आले आहे. इतकेच नव्हे, तर ‘कच्चा बादाम’चे पाकिस्तानी ‘रमजान व्हर्जन’ सोशल मीडियावर ट्रेंडही करू लागले आहे. या व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे, रिमिक्स व्हर्जनसोबतच मांजर आणि पक्ष्यांचे सूरही ऐकायला मिळत आहेत.

ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला यासिर
विचित्र व्हायरल व्हिडिओंसाठी प्रसिद्ध असलेला, पाकिस्तानी यू-ट्यूबर यासिर सोहरवर्दीने हे गाणे तयार केले आहे. त्याने ७ एप्रिल रोजी यू-ट्यूवर ‘कच्चा बादाम’चे पाकिस्तानी व्हर्जन अपलोड केली. व्हिडिओ समोर आल्यापासून ट्विटरवर मीम्सचा पूर आला आहे. काही लोक यासिरच्या गाण्याची स्तुती करत आहेत, तर काहीजण त्याची खिल्ली उडवत आहेत. (pakistani artist releases ramzan version of kacha badam netizens reacts on social media)

बहुतेक सोशल मीडिया युजर्सचे म्हणणे आहे की, यासिरने हे गाणे रिलीझ करण्यासाठी रमजानचा पवित्र महिना निवडला, जे त्यांच्या मते, त्यांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी केले गेले आहे. एका ट्विटर युजर विचारले की, “आम्ही धर्माचा असा वापर करतो.” दुसर्‍याने लिहिले, “कच्च्या बादामचे हलाल व्हर्जन आले आहे.”

हा व्हिडिओ आणि गाणे दोन्ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अवघ्या काही महिन्यांत, ट्रॅकला २१ दशलक्षपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या मूळ गाण्याचे रिमेक व्हर्जन बनवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यापैकी बहुतेक व्हायरलही झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा