बंदे में ये भी टॅलेंट है! अभिनेत्याने हँडपॅन वाजवून पूर्ण केले आपले लहानपणीचे स्वप्न, पाहा व्हिडिओ


बॉलिवूडमध्ये काम करण्याची स्वप्ने अनेकजण पाहत असतात. त्यासाठी आपले नशीब आजमावून पाहण्यासाठी अनेकजण स्वप्नांची नगरी मुंबईत दाखल होतात. यात आपला ठसा उमटवण्यासाठी हजारो संघर्ष करत एक दिवस आपले स्वप्न नक्कीच सध्या करतात. अशाच एका कलाकारांपैकी एक म्हणजे ‘पंकज त्रिपाठी’.

पंकज त्रिपाठी यांचे नाव बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांमध्ये गणले जाते. अनेक छोट्या चित्रपटांमध्ये भूमिका ते साकारत होते. परंतु त्यांना खरी ओळख मिळाली ती २०१८ मधील सर्वात हिट ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजने. याचबरोबर त्यांनी ‘गॅंग ऑफ वासेपुर’ या चित्रपटात देखील मोलाची भूमिका साकारली होती.

अभिनयासोबतच पंकज यांना अनेक छंद आहेत. सोबतच त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक स्वप्ने पूर्ण केली आहेत. लहानपणापासूनच वाद्य वाजवणे हे त्यांचे मोठे स्वप्न होते. हे स्वप्न त्यांनी नुकतेच पूर्ण केले. ते हँडपॅन नावाचे एक संगीतयंत्र वाजवायला शिकले.

आपल्या चाहत्यांसोबत ही आनंदाची गोष्ट शेअर करताना त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये ते हे वाद्य वाजवताना दिसत आहेत. केवळ पाच दिवसात ते स्वत: वाजवायला शिकले. त्यांचा हा व्हिडिओ लाखो प्रेक्षकांनी  पाहिला आहे.

सन २०१७ मध्ये त्यांच्या ‘न्यूटन’ या चित्रपटाला बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाला होता, त्यावेळी त्यांनी युरोप आणि पोलंडचा दौरा केला होता. दरम्यान पोलंडमधील एका संग्रहालयाला त्यांनी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी त्या संग्रहालयाच्या बाहेरच रस्त्यावर एका कलाकाराला हँडपॅन वाजवताना पाहिले होते, तेव्हा ते जवळजवळ अर्धा तास तिथे थांबले आणि त्यांनी वाजवताना रेकॉर्ड सुद्धा केले. त्यांना ते यंत्र इतके आवडले की त्यांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि अखेर अथक प्रयत्नानंतर त्यांना भारतात तो हँडपॅन सापडला. तो हँडपॅन ते या व्हिडिओमध्ये वाजवताना दिसत आहेत.

हे हँडपॅन पंचवीस वर्षांपूर्वी तयार केले गेले आहे. ते वाजवण्यासाठी त्यांना पुण्यात एक अनुभवी शिक्षक देखील सापडला, जो त्यांना ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून शिकवण्यास इच्छुक होता, असे त्रिपाठी यांनी सांगितले.

पंकज त्रिपाठी यांनी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. २००७ मध्ये ‘रन’ या चित्रपटात त्यांना पहिली संधी मिळाली होती. आज ते एक यशस्वी अभिनेता म्हणून नावारूपास आले आहेत. सोबतच त्यांनी ‘बरेली की बर्फी’, ‘स्त्री’ या चित्रपटात देखील मोलाची भूमिका निभावली होती. मिर्झापूर वेब सीरिजमधील त्यांची अखंडानंद त्रिपाठी ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप पाडल्यानंतर आता ते हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी देखील सज्ज झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तब्बल २४ फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर ‘हा’ अभिनेता करणार होता आसाममध्ये चहाच्या मळ्यात काम, पण…

-लग्नानंतर केवळ ८ दिवसांत अभिनेत्रीला चुकिच्या व्यक्तीशी लग्न केल्याची झाली होती जाणीव, पुढे घटस्फोट घेत…

-रेखासारख्या अभिनेत्रीसमोर उत्तम अभिनय करणारी ‘सोनू वालिया’, उंचीमुळे मिळत नव्हते चित्रपटात काम


Leave A Reply

Your email address will not be published.