Monday, June 24, 2024

एका रात्रीत अनुपमा शोमधून बाहेर होणारा अभिनेता पारस कलनावत दिसणार एकता कपूरच्या ‘या’ शोमध्ये?

टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता पारस कलनावत मागील काही काळापासून सतत चर्चेत आहे. पारसला एका रात्रीत ‘अनुपमा’ शोमधून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर तो सतत लाइमलाईट्मधे होता. सोशल मीडियावर देखील त्याला काढून टाकल्यानंतर नेटकऱ्यांच्या जोरदार प्रतिक्रिया आल्या. त्यांनी पारसला पूर्ण पाठिंबा दर्शवला. शोमध्ये त्याच्या भूमिकेला खूपच पसंत केले जात होते. अशात त्याला काढून टाकणे लोकांना आवडले नाही. त्यानंतर तो झलक दिखला जा मध्ये देखील दिसला आणि त्याची डान्समधील प्रतिभा दाखवली. आता पारसच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बाब आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार पारस कलनावत लवकरच कुंडली भाग्यमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शोमध्ये लीप येणार असून, त्यानंतर अनेक नवनवीन चेहरे शोमध्ये दिसणार आहे. आधी देबत्तमा साहा, सुंबुल तौकीर आणि सृष्टि जैन या कलाकारांची नवे मुख्य भूमिकेसाठी समोर येत होती, मात्र आता पारस कलनावत आणि हर्ष राजपूत यांचे नाव समोर येत आहे. अशातच जर ही बातमी खरी असली तर लवकरच पारस एका नवीन शोमध्ये नवीन भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अनुपमा शोमधून काढल्यानंतर पारस बरेच दिवस चर्चेत होता. त्यावेळी त्याने सांगितले की, शोमध्ये मिळणाऱ्या स्क्रीन स्पेसमुळे तो खुश नाही. अशातच त्याला झलक दिखला जा ची ऑफर आली आणि तो हो म्हणाला. दुसऱ्या चॅनेलसोबत शो करणे निर्मात्यांना आवडले नाही आणि त्यांनी एका रात्रीत त्याला बाहेर काढले. पारस खरंच आणि लवकरच नवीन शोमध्ये दिसावा अशीच इच्छा त्याचे फॅन्स व्यक्त करत आहे. आता लवकरच ही बातमी अधिकृत रित्या समोर यावी अशीच सर्वाना अशा आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियाला अचानक ठोकला रामराम, पोस्ट शेअर करत दिली माहिती
अत्यंत वादग्रस्त : ‘स्वरा भास्कर जर हजारो पुरुषांसोबत रात्र घालवणार…’, अयोद्धेतील महंताच्या विधानाने खळबळ

हे देखील वाचा