Saturday, June 29, 2024

लगीन घटका समीप आली! ‘या’ दिवशी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा अडकणार विवाह बांधणात

गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वातून एकवर एक सुखद बातम्या येत आहेत. अनेक कलाकारांनी आपले पाटनर शोधले आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा देखील मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेली अभिनत्री आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. सध्या परिणीती चोप्रा आणि नेते राघव चढ्ढाच्या लग्नाच्या बातमा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. ते दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

माध्यमातील वृत्तानुसार, परिणीती (Parineeti Chopra) आणि राघव (Raghav Chadha) या महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत आणि त्याची तयारी जोरात सुरू आहे. त्यांच्या लग्नाला फक्त कुटुंबीय आणि काही खास मित्र उपस्थित राहणार आहेत. परिणीती आणि राघव उदयपूरमध्ये सात फेरे घेणार आहेत. परिणीती आणि राघवचे लग्न खूप भव्य होणार आहे. परिणीती तिच्या लग्नाबद्दल कोणातीही माहिती शेअर करत नाही. त्यांचे कुटुंब आणि टीम कामाला लागली आहे. परिणीती आणि राघवचे लग्न उदयपूरमधील एका 5 स्टार हॉटेलमध्ये होणार आहे. हे लग्न उदयपूरच्या ओबेरॉय उदयविलास हॉटेलमध्ये होणार आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या डेटिंगच्या बातम्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दोघेही रेस्टॉरंटच्या बाहेर अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. यानंतर दोघांनी 13 मे रोजी कुटुंबीय आणि मित्रमंडळींमध्ये एंगेजमेंट केली. यानंतर या जोडप्याने लग्नासाठी अनेकवेळा राजस्थानला भेट दिली आणि नंतर लग्नासाठी उदयपूरला फायनल केले. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाला चित्रपट आणि राजकीय जगतातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा या जोडप्याच्या लग्नाचा फंक्शन आठवडाभर चालणार असून 17 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. लग्नासाठी येणाऱ्या इतर खास पाहुण्यांसाठी लग्नस्थळाच्या आजूबाजूची खास ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. 17 सप्टेंबरपासून पाहुण्यांच्या आगमनाची प्रक्रिया सुरू होईल. यानंतर 18 ते 20 पर्यंत अनेक छोटी-मोठी कार्येक्रम होतील. यानंतर 21 आणि 22 तारखेला मेहंदी, कॉकटेल पार्टी आणि संगीत यांसारख्या फंक्शन ठेवण्यात येणार आहे. परिणीती चोप्रा आणि राघवच्या लग्नाचा मुख्य सोहळा 23 आणि 24 सप्टेंबरला होणार आहे. तर 25 सप्टेंबरला ते लग्नबंधनात अडकणार आहेत. ( Parineeti Chopra and Raghav Chadha will tie the knot on September 25)

अधिक वाचा-
पंकज त्रिपाठीने केले हिंदी भाषेचे कौतुक, ऐकून लोकांना देखील वाटला अभिनेत्याचा अभिमान
‘बॉईज 4’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; धैर्य, ढुंग्या, कबीर पुन्हा घालणार राडा

हे देखील वाचा