Tuesday, May 21, 2024

परिणीती चोप्राचा पॅपराझींसमाेर संताप अनावर, फोटो क्लिक करण्यासही दिला नकार, व्हिडिओ व्हायरल

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने गेल्या महिन्यात आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढासोबत एंगेजमेंट केली. अशात परिणीती तिच्या एंगेजमेंट पासून चांगलीच चर्चेत आहे. दरम्यान अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समाेर आला आहे, ज्यामध्ये परिणीती पॅपराझींवर रागवताना दिसत आहे.

परिणीती चोप्रा (parineeti chopra ) हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. खरे तर, असे झाले की, परिणीती बऱ्याच दिवसांनी मुंबईत स्पॉट झाली. यादरम्यान पॅपराझींनी तिला घेरले आणि याच कारणांमुळे अभिनेत्री चांगलीच संतापली.

पॅपराझींने परिणीतीला पाहिल्यानंतर आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी धाव घेतली, परंतु अभिनेत्री फाेटाे क्लिक करण्याच्या मूडमध्ये नव्हती. अशात परिणीती पॅपराझींवर संतापली आणि तिने फोटो क्लिक करण्यास स्पष्ट नकार दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सर्वप्रथम पॅपराझींना पाहून परिणीतीने आधी पाठ फिरवली आणि मग म्हणाली, ‘अरे यार, थांबा.’ गुलाबी सलवार-सूटमध्ये दिसणार्‍या परिणीतीचा हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे आणि लोक त्यावर भिन्नभिन्न प्रतिक्रिया देत आहेत. अनेक युजर्सनी परिणीतीच्या अशा वागण्यावर चिंता व्यक्त केली, तर काही लोक परिणीतीला ‘अहंकारी’ म्हणत आहेत आणि पॅपराझींने तिच्याकडे इतके लक्ष देऊ नये असे सांगितले आहे.

काल रात्री अवॉर्ड फंक्शनमधून बाहेर पडतानाही परिणीती चोप्राला पॅपराझींनी घेरले होते. खरे तर, जेव्हा परिणीती लिफ्टच्या आत गेली, तेव्हा पॅपराझी तिला लग्नाबद्दल विचारत होते की, लग्न कधी होणार? त्याचवेळी एकाने विचारले की, लग्नानंतरचे आयुष्य कसे चालले आहे? त्यावर अभिनेत्रीने प्रतिउत्तर देत सांगितले की, ‘तिचे अजून लग्न झालेले नाही.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

परिणीतीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर परिणीती लवकरच इम्तियाज अलीच्या ‘चमकिला’ चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये ती दिलजीत दोसांझसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.(bollywood actress parineeti chopra bashes out paparazzi as she spotted in mumbai people trolled her)

अधिक वाचा:
तब्बल 150 वर्षे जगण्यासाठी मायकल जॅक्सन झोपायचा ऑक्सिजन बेडवर; बूटामध्ये लपले होते डान्सचे गुपीत
व्हायरल फोटोंनंतर गेहना वशिष्ठने फैजानसोबत लग्न न झाल्याचा केला खुलासा; म्हणाली, ‘माझ्या बॉयफ्रेंडचे नाव..’

हे देखील वाचा