बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड सगळेच कलाकार सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून त्यांच्या चाहत्यांशी जोडून राहत असतात. अशीच बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा देखील खूप सक्रिय असते. या दिवसात परिणीती चोप्रा तुर्कीमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. नुकतेच तिने समुद्र किनारी बसलेला तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा फोटो पाहून तिचे चाहते खूपच खुश झाले आहेत. या फोटोवर सर्वजण लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. परिणीतीची बहीण प्रियांका चोप्राने देखील तिच्या या फोटोवर कमेंट केली आहे. यानंतर तिचा हा फोटो खूप चर्चेत आला आहे.
परिणीतीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये पाहू शकता की, परिणीती समुद्र किनारी वाळूमध्ये गॉगल लावून बसली आहे. या फोटोमध्ये ती खूपच फिट ग्लॅमरस दिसत आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “मी हा फोटो काढण्याआधी प्राणायाम करत होते. ओके हे खोटं आहे.”
परिणीतीचे चाहते तिच्या या फोटोसोबत तिच्या कॅप्शनला देखील प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या चाहत्यांना तिचा हा फोटो खूपच आवडला आहे. तिची बहिणी प्रियांका चोप्राने देखील या फोटोवर कमेंट केली आहे. तिने कमेंट करत लिहिले की, “मी खूप जळत आहे.” या सोबतच तिने हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे. परिणीती चोप्राचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
परिणीती चोप्राच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती शेवटची ‘सायना’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट सायना नेहवाल हिच्या जीवनावर आधारित होता. प्रियांका चोप्राबद्दल बोलायचे झाल्यास ती सध्या लॉस एंजेलिसमध्ये तिच्या पतीसोबत एन्जॉय करत आहे.
परिणीती चोप्राने 2011 मध्ये ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. परंतु 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्कजादे’ या चित्रपटातून तिला ओळख मिळाली. त्यानंतर तिने ‘शुद्ध देशी रोमान्स’, ‘गोलमाल अगेन’, ‘केसरी’ आणि ‘जबरिया जोडी’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तिचे नुकतेच काही दिवसांपूर्वी ‘संदीप ऑर पिंकी फरार’, ‘सायना’ आणि ‘द: गर्ल ऑन द ट्रेन’ या चित्रपटात काम केले आहे. पण हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकले नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आहा कडकच ना! ‘लुट गए’ गाण्यावर पोरीचा जबरदस्त डान्स, मिळाले १ कोटीपेक्षाही अधिक व्ह्यूज