भारतातील कोरोना परिस्थिती पाहून एंजेलिना जोलीनेही व्यक्त केले दु:ख; म्हणाली, ‘माझ्याकडे शब्द नाहीयेत…’


संपूर्ण जगात मागच्यावर्षी पासून कोरोना व्हायरसचा सुरू झालेला कहर थांबायचे काही नाव घेत नाही. केसेस कमी होतात आणि पुन्हा काही दिवसांनी केसेस वाढायला लागतात. मागच्या वर्षी भारत सोडून जगात अनेक देशांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला. मात्र, सुदैवाने भारतात स्थिती चांगली होती, पण २०२१मधील पहिले दोन- तीन महिने सोडले तर भारतात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. यावेळेस तर अधिक ताकदीने कोरोनाने त्याचे हातपाय पसरले. भारताच्या या अतिकठीण काळात जगभरातील असंख्य देश, नामी व्यक्ती, नेते आदींनी त्यांचा पाठिंबा देत लवकरच भारत या कठीण काळातून बाहेर यावा अशी अशा व्यक्त केली.

यात मनोरंजन क्षेत्रातील कलाकार देखील मागे नव्हते. रिज विदरस्पून, कॅमिला कॅबेलो, विल स्मिथ यांच्यानंतर आता हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री एंजेलिना जोलीने देखील भारतीयांना धीर देत लवकरच परिस्थिती नीट होईल अशी आशा ठेवण्याची विनंती केली आहे. एंजेलिनाने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “अतिशय दुःखद अंतकरणाने मी भारताच्या लोकांना सांगू इच्छिते, माझ्याकडे तुम्हाला सांगायला खरंच शब्द नाहीयेत की, तुमचे दुःख पाहून मला किती त्रास होत आहे.”

एंजेलिनाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले, तर तिने तिचा पती ब्रैड पिट सोबत घटस्फोट घेतला आहे. मात्र, सध्या ती तिच्या मुलांच्या कस्टडीवरून चर्चेत आहे. २०१६ साली एंजेलिना आणि ब्रॅड पिट यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यानंतर काही काळाने त्यांना घटस्फोट मिळाला. पण त्यानंतर त्यांच्यामध्ये मुलांच्या कस्टडीवरीन वाद सुरू होते. जवळपास पाच वर्षे त्यांनी कायद्याच्या मदतीने या कस्टडीसाठी प्रयत्न केले. अखेर आता कोर्टाने त्यांना मुलांची जॉईंट कस्टडी दिली आहे.

एंजेलिना जॉली आणि ब्रॅड पिट यांना सहा मूले आहेत. ज्यातील तीन मुलं त्यांची आहेत, तर तीन मुलं त्यांनी दत्तक घेतली आहे. एंजेलिना आणि ब्रॅड यांचा मोठा मुलगा मेडॉक्स हा १९ वर्षाचा आहे. त्याच्यावर हा निर्णय लागू होत नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उर्वशी रौतेलाकडून मोठी चूक; तब्बल ७२ तासांपासून वाट पाहणाऱ्या चाहत्यांची अभिनेत्रीने हात जोडून मागितली माफी

-आहा कडकच ना! ‘लुट गए’ गाण्यावर पोरीचा जबरदस्त डान्स, मिळाले १ कोटीपेक्षाही अधिक व्ह्यूज

-‘हम तो तेरे आशिक है’ मालिकेच्या आठवणीत प्रसाद ओकने शेअर केली पोस्ट; चाहते करतायेत मालिकेच्या दुसऱ्या पर्वाची मागणी


Leave A Reply

Your email address will not be published.