मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सतत काही ना काही पोस्ट करून ती चाहत्यांचे मनोरंजन करते. एवढेच नव्हे, तर तिचे सुंदर व आकर्षक फोटो पोस्ट करून ती अवघ्या चाहत्यावर्गाचे लक्ष आपल्याकडे वेधत असते. सतत तिचे नवनवीन फोटोशूट ती चाहत्यांसमोर सादर करत असते.
नुकतेच प्रार्थनाने तिचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केली आहे, ज्यात ती अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. यातील तिच्या अदा चाहत्यांना घायाळ करण्यासाठी पुरेश्या आहेत. विशेष म्हणजे पारंपारिक प्रमाणेच प्रार्थना वेस्टर्न लुकमध्येही उठून दिसते.
इंस्टाग्रामवर आपले फोटो शेअर करत प्रार्थना कॅप्शनमध्ये म्हणतेय की, “नैणों की मत माणियो रे, नैणों की मत सुणियो, नैणा ठग लेंगे. जगते जादू फूकेंगे रे, जगते-जगते जादू, नींद बंजर कर देंगे, नैणा ठग लेंगे….” तिने शेअर केलेले हे फोटो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर अक्षरशः लाईक्सचा पाऊस पाडला आहे. तसेच, कमेंट करत नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. विशेष म्हणजे चाहत्यांसह कलाकारांनी देखील यावर कमेंट करून प्रार्थनाच्या सौंदर्याचे कौतुक केलं आहे.
प्रार्थना बेहेरेने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली होती. ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय हिंदी मालिकेत वैशालीची भूमिका साकारत ती घराघरात पोहचली. पुढे ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारत तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याव्यतिरिक्त तिने ‘बॉडीगार्ड,’ ‘वजह तुम हो’ या हिंदी चित्रपटातही काम केले आहे. प्रार्थना आता लवकरच ‘छूमंतर’ या आगामी मराठी चित्रपटात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दिव्यांका त्रिपाठीला आली होती ‘दया बेन’च्या रोलसाठी ऑफर? खरं काय ते घ्या जाणून
-‘किंग खान’च्या लाडकीने केला जिममधील मिरर सेल्फी शेअर; दिसतेय एकदम ‘फिट एँड फाईन!’