Wednesday, July 3, 2024

अनेक सुपरहिट सिनेमे दिलेली अभिनेत्री झाली होती मानसिक रुग्ण, अमेरिकेत झाली होती जेलबंद

बॉलिवूड विश्वात आजवर अश्या बऱ्याच कमी अभिनेत्री होऊन गेल्या कि, ज्यांनी चित्रपट नायिकेचा चेहरा मोहराच बदलून टाकला. त्यातलीच एक स्मार्ट अभिनेत्री म्हणजेच परवीन बाबी. परवीन बाबी यांनी आपल्या सिने कारकीर्दीत अनेक चित्रपट सुपरहिट केले ,आणि आपल्या मोहक अदांनी रसिकांना घायाळ केले. तिने आपल्या उत्कृट कामगिरीने लोकांच्या मनावर अभिराज्य गाजवले. आज अशा अभिनेत्रीचा वाढदिवस साजरा करत आहोत.

परवीन बाबी हीचा जन्म ४ एप्रिल १९४९ रोजी गुजरातमधील जूनागड येथे झाला. जुनागडमधील कुलीन कुटुंबातील ती एकुलती एक मुलगी होती, जी गुजरातमधील पठाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “पश्तून” समाजाच्या “बाबी” वंशाची होती. तिच्या पालकांच्या विवाहाला चौदा वर्ष झाल्यानंतर परवीनचा जन्म झाला. तिचे वडील, वली मोहम्मद खान बाबी, जुनागडचे दिवाण होते ,आणि तिची आई जमाल बख्ते बाबी होती. १९५९ मध्ये तिने वडिलांना गमावले. तिने आपले प्राथमिक शिक्षण ‘माउंट कार्मेल हायस्कूल, अहमदाबाद’ येथून केले, आणि नंतर ‘सेंट. झेविअर्स कॉलेज, अहमदाबाद’ इथे तिने इंग्रजी साहित्यात “बॅचलर ऑफ आर्ट्स” मिळवले.

१९७२ ला तिने मॉडेलिंगमधून आपल्या करियरची सुरवात केली. त्या काळातले प्रसिद्ध निर्माता निर्देशक बी. आर. इशारा यांची नजर परवीन बाबींवर पडली ,तेव्हा ते परवीन बाबीला बघतच राहिले . त्यावेळी तिने मिनी स्कर्ट घातलेला होता, आणि हातात  सिगारेट होती. हि अदाकारी बघून बी. आर. इशारा यांनी तिला चित्रपटासाठी विचारले ,आणि तीने लगेचच होकार दिला. अगदी कमी वेळातच १९७३ला ‘चरित्र’ या चित्रपटातून आपल्या बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनयाचा ठसा उमटवायला सुरवात केली. मॉडेलिंगमुळे सगळं जग परवीन बाबीसाठी वेड होतं ,आणि ती डॅनी डेन्झोंगपासाठी. पण हे नातं फार काळ टिकलं नाही.

नंतर खऱ्या अर्थाने तिला ओळख मिळाली ती, अमिताभ बच्चनसोबतच्या  “मजबूर” (१९७४) या चित्रपटातून. त्यानंतर या दोघांचे अनेक चित्रपट हिट झाले. तिच्या संपूर्ण कारकीर्दीत, ती एक मोहक फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जात असे, आणि ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. परवीन बाबी ही वेगवेगळ्या पोशाखांसाठी आणि विविध भूमिकांसाठी ओळखली जाते.

दीवार (१९७५) या अ‍ॅक्शन क्राइम-ड्रामा चित्रपटात अनिता नावाच्या भूमिकेसाठी अभिनय केला होता. जिने तिला जबरदस्त फॅन फॉलोविंग मिळवून दिली, आणि तिला मुख्य अभिनेत्री म्हणून नाव मिळवून दिले . १९७० च्या दशकात आणि १९८० च्या सुरुवातीच्या काळात ती अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये दिसली.

तिच्या मुख्य भूमिका म्हणजे – अमर अकबर अँथनी (१९७७) मधील जेनी, सुहागमधील अनु (१९७९), काला पत्थर (१९७९) मधील अनिता, बर्निंग ट्रेनमध्ये शीतल. (१९८०), शानमधील सुनीता (१९८०), शालिनी / कालियामधील राणी (१९८१), आणि निमा हमाल (१९८२).

हेमा मालिनी, रेखा, शबाना आझमी, स्मिता पाटील, झीनत अमान, रीना रॉय आणि राखी यांच्यासह परवीन तिच्या काळातील सर्वात यशस्वी अभिनेत्री होती. तिने अमिताभ बच्चन यांच्याबरोबर आठ चित्रपटात काम केले. सर्व हिट किंवा सुपर हिट झाले.

शशी कपूरच्या बरोबर “नमक हलाल” (१९८२), फिरोज खान बरोबर “काला सोना” (१९५५), संजय खान बरोबर “चांदी सोना” (१९७७)  आणि धर्मेंद्र बरोबर “जानी दोस्त” (१९८३) सारख्या अन्य हिट चित्रपटांमध्ये देखील काम केले.

बाबीचे व्यक्तिमत्त्व पाश्चात्य संस्कृतीचे प्रतीक म्हणून बघीतले गेले, बॉलिवूड निर्मात्यांना तिला ठराविक भारतीय नारी आणि गाव की गोरी भूमिका देणे अवघड होते. तिने प्रामुख्याने पाश्चिमात्य आणि ग्लॅमरस भूमिकांमध्ये मुख्य भूमिका साकारली. त्या काळातील अनेक व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांमध्ये ती दिसली, आणि तिचे मुख्य सह-कलाकार अमिताभ बच्चन, शशी कपूर, फिरोज खान, धर्मेंद्र आणि विनोद खन्ना हे होते, जे १९७० आणि १९८० च्या दशकातील सर्व प्रमुख स्टार होते.

परवीन बाबी हि त्या काळातील उत्कृष्ठ इंग्लिश बोलणारी अभिनेत्री होती. ही पहिली भारतीय अभिनेत्री होती जिला १९७९ मध्ये टाईम मॅगझीनच्या फ्रंट पेजवर जागा मिळाली. परवीन बाबीने भारतीय चित्रपटसुष्टीला बोल्ड आणि ग्लॅमरस कसं राहायचा हे शिकवून दिलं. नंतर त्या काळातील मॉडेल आणि ऍक्टर कबीर बेदी आणि महेश भट्ट सोबतचे नाते  खूप गाजले.

१९८३ ला परवीन बाबी काही काळासाठी चित्रपटांतून  दूर झाली. ती कॅलिफोर्निया अमिरिकेत जाऊन इंटिरियर डिझायनर म्हणून काम करू लागली. त्याचं खरं कारण होतं, ते म्हणजे ,तिच्या मनाची अशांतता ,आयुष्यातले  एकटेपण. काही लोक सांगतात, ती अंडरवर्ल्डला त्रासली होती, त्यामुळे ती निघून गेली अमेरिकेला. पण तिकडे जाऊन तिचे मानसिक संतुलन अजून बिघडायला लागले.

एकदा जॉन एफ. कॅनडी  इंटरनॅशनल एअरपोर्टववरून ती बाहेर जात होती, तेव्हा तिला तिची ओळख विचारली, पण परवीन बाबी तिची ओळख सांगण्यास असमर्थ ठरली. याच कारणामुळे त्यांच्या हाताला हातकडी लावून, अश्या खोलीत ठेवले जिकडे आधीपासूनच मानसिक रुग्ण होते, तेव्हा भारतीय दूतावासाने तिला मदत केली, आणि यातून तिची सुटका केली. पण तोपर्यन्त हे सिद्ध झालं होतं, कि त्यांना मानसिक आजार झालेला आहे. पण त्यांनी ही गोष्ट कधीच मान्य केली नाही. ६ वर्षानंतर १९८९ ला ती भारतात परतली. इरादा (१९९१) हा तिचा शेवटचा चित्रपट होता. सन २००५ मध्ये किडनी निकामी झाल्याने त्यांचा एकाकी मृत्यू झाला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पुरंदर तालुक्यातील ‘या’ गावचे आहेत रजनीकांत, आजही सुपरस्टारच्या भेटीसाठी गावकरी पाहातायत वाट

-‘त्या’ व्यक्तीची नजर ‘विशाल वीरु देवगन’वर पडली अन् इंडस्ट्रीला अजय देवगन मिळाला, नाहीतर…

हे देखील वाचा