Sunday, June 4, 2023

पायल रोहतगीचा दीपिका पदुकोणला पाठिंबा; म्हणाली, ‘त्याला लाथ मारून…’

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा आगामी ‘पठाण‘ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘बेशरम रंग‘ हे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्यात दीपिकाने खूप बोल्ड सीन्स दिले आहेत. प्रेक्षकांना तो खूप आवडला असला तरी काही लोकांना दीपिका पदुकोणचा हा लूक आवडला नाही. अशा परिस्थितीत हे प्रकरण आता राजकीय वर्तुळात पोहोचले आहे. दीपिकाच्या बिकिनी लूकचा अनेक ठिकाणी तीव्र विरोध होत आहे. मध्य प्रदेशातील एका मंत्र्याने इशारा दिला होता की, ‘पठाण’चे काही सीन आणि दीपिकाचे कपडे बदलले नाहीत, तर चित्रपट त्या राज्यात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही. या सगळ्या दरम्यान आता अभिनेत्री पायल रोहतगी हिने तिचं वक्तव्य केलं आहे. 

दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरून झालेल्या या वादामुळे आता सुप्रसिद्ध अभिनेत्री पायल रोहतगी ( payal rohatgi) हिने आपले मत मांडत म्हटले आहे की, “दीपिका पदुकोणने सनातन धर्माशी संबंधित आमच्या देवांचे चित्र बिकिनीमध्ये ठेवले आहे असे नाही. अशा परिस्थितीत केवळ रंगावरून लक्ष्य करणे योग्य नाही. मी ज्या रिअॅलिटी शोमध्ये होते, त्यात आमचा युनिफॉर्म एकाच रंगाचा होता. आम्ही त्याला लाथ मारून फाडून टाकायचो. मग आमचीही चूक आहे का?”

पायल आपला मुद्दा पुढे करत म्हणाली की, “असे आक्षेप घेणारे लोक मूर्ख आहेत. त्यांची ही वृत्ती केवळ प्रसिद्धीसाठी आहे असे दिसते. अशा गोष्टींमुळे ‘पठाण’चे नुकसान होणार नाही, तर फायदाच होईल.” पायलच्या मते, “प्रसिद्धी नकारात्मक असो वा सकारात्मक, ती नक्कीच कामी येते.” पायल म्हणाली की, “लोक विनाकारण दीपिका पदुकोणला टार्गेट करत आहेत.”

शाहरुख खान चार वर्षांनी ‘पठाण’ चित्रपटातून पडद्यावर परतत आहे. आगामी वर्ष अभिनेता आणि त्याच्या चाहत्यांसाठी खूप खास असणार आहे. यावर्षी शाहरुखचा पठाण व्यतिरिक्त ‘जवान’ आणि ‘डंकी’ हा चित्रपटही रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत, शाहरुखचे चाहते त्याच्या पठाण चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी 2023ला सिनेमागृहामध्ये रिलीज होणार आहे. (bollywood `song besharam rang controversy payal rohatgi came out in support of actre`s`s deepika-padukone)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
सोनू सूदच्या भलेपणाला खबी लामेने दिली खरी शिकवण, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

कंगनाने बहिणीवर झालेल्या ऍसिड हल्ल्याची सांगितली व्यथा, घटना वाचून तुम्हचाही उडेल थरकाप

हे देखील वाचा