शाहरुख खान स्टारर बहुचर्चित चित्रपट पठाणने अवघ्या भारतीयांना वेड लालवलं आहे. तब्बल 4 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या शारुखने खरंच मोसम बदलला आहे. (दि, 25 जानेवारी) रोजी प्रदर्शित पठाणने पहिल्याच दिवशी तब्बल 57 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. बॉक्स ऑफिसवर तर चित्रपटाने धुमाकुळच घातला आहे. एकीकडे चित्रपटाचा वाद आणि दुसरीकडे चाहत्यांप्रती मिळणार प्रतिसाद असं दृष्य पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिय मांडल्या होत्या. मात्र, चित्रपटाच्या कोणत्याही स्टारकास्टने कोणतीच प्रतिक्रिय दिलेली नव्हाती.
पठाण (Pathan) चित्रपटामधील बेशरम रंग (Besharam Rang) गाणं प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या घेऱ्यात अडकलं होतं, कारण अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिने गाण्यामध्ये भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे अनेक हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्यामुळे चित्रपटावर बॉयकॉट मोहीम सुरु केली होती. मात्र, एवढं सगळं असतानाही चित्रपटाने छप्परतोड कमाई केली आहे. चित्रपटाच्या ट्रोलिंगमुळे पठाणचं प्रमोशनही करण्यात आलं नाही, फक्त ट्रेलर आणि गाण्यांनीच चित्रपटाला एवढी प्रिसिद्धी लाभली आहे.
View this post on Instagram
पठाणच्या बयकॉटमुळे कोणत्याही कलाकाराने कोणत्याही मीडिया हाउसला भेट दिली नव्हती मात्र, आता लवकरच शाहरुख खान मौन सोडणार आहे. आज (दि, 30 जानेवारी ) रोजी पठाण चित्रपटाची पुर्ण कास्ट म्हणजेच दीपिका पादुकोण (Deepika Padukone), अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद (Sidharth Anand) थेट मीडियाशी संवाद साधणार आहेत.
Mehmaan Nawaazi Pathaan ke ghar par… Thank u all my Mehmaans for making my Sunday so full of love. Grateful. Happy. Loved. pic.twitter.com/ivfpK07Vus
— Shah Rukh Khan (@iamsrk) January 29, 2023
माध्यामातील वृत्तानुसार पठाणच्या यशा निमित्ताने चित्रपटाची पुर्ण कास्ट प्रथमच मीडियाशी संवाद साधणार आहे. यासाठी पत्रकार आणि इतर चाहते देखिल खूपच उत्सुक आहेत. पठाणने काही दिवसातच तब्बल 200 कोटींचा गल्ला जमवला आहे त्याशिवया बॉक्सऑफिसवर 1 किंवा 2 नाही तर तब्बल 20 रेकॉर्ड मोडले आहेत. त्यामुळे बॉलिवूडवर आनंदाची लाट पसरली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
ब्रेकिंग! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्रीचे निधन, कलाविश्वात पसरली शोककळा
कधीकाळी नाना पाटेकरांसोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री आयशा जुल्का, सध्या करते ‘हे’ काम