Sunday, December 8, 2024
Home भोजपूरी ‘या’ भोजपुरी अभिनेत्याच्या पहिल्या बायकोने केली होती आत्महत्या, दुसरे लग्न केल्यानंतरही अफेअरचा खुलासा

‘या’ भोजपुरी अभिनेत्याच्या पहिल्या बायकोने केली होती आत्महत्या, दुसरे लग्न केल्यानंतरही अफेअरचा खुलासा

भोजपुरी चित्रपटसृष्टी खूपच वेगाने यश मिळवताना दिसत आहे. यामध्ये अनेक दिग्गज कलाकार आणि गायक आहेत. यातील एक नावाजलेला कलाकार आणि गायक म्हणजे पवन सिंग. त्याच्या ‘लॉलीपॉप लागेलू’ या गाण्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये अफाट वाढ होत आहे. त्यामुळे तो या दिवसात खूपच चर्चेत असतो. परंतु पवन सिंगला या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर जेवढी ओळख मिळाली, तेवढाच त्याला अनेक वादांचा देखील सामना करावा लागला. जाणून घेऊया त्याच्या या प्रवासाबद्दल…

पवनचा जन्म बिहारमधील आरा या शहरात झाला आहे. त्याचे वडील हे शेतकरी होते. तिथेच त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. पवनला लहानपणापासून गायनाची खूप आवड होती. त्याने 1997 साली आपला पहिला गाण्याचा अल्बम बनवला होता. ज्याचं नाव ‘ओढनिया वाली’ हे होते. त्यांनतर त्याने अनेक वर्षे संघर्ष केला.

त्यानंतर त्याने 2004 मध्ये ‘रंगली चूनारिया’ या भोजपुरी चित्रपटात काम केले. त्यानंतर त्याचे नशीबच पालटलं आणि त्याच ‘लॉलीपॉप लागेलू’ हा अल्बम रिलीझ झाला. या अल्बमने कितीतरी रेकॉर्ड मोडले होते. हे गाणे इतके सुपरहिट झाले की, संपूर्ण जगभरात त्याची ओळख निर्माण झाली.

सन 2014 मध्ये त्याने नीलम सिंगसोबत लग्न केले. लग्नाच्या अवघ्या एक वर्षांनंतरच नीलमने मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. त्यावेळी पवनवर त्याने त्याच्या बायकोची हत्या केल्याचा आरोप लावला गेला होता. माध्यमांतील वृत्तानुसार, पवन त्याच्या कामात खूप व्यस्त असायचा. त्यामुळे तो त्याचा बायकोला वेळ देऊ शकत नव्हता, म्हणून त्याची बायको तणावाखाली आली. काहींचे तर असेही म्हणणे होते की, पवन अनेक अभिनेत्रींसोबत असायचा त्यामुळे त्याच्या बायकोने एवढे मोठे पाऊल उठवले.

सन 2018 मध्ये पवनने दुसरे लग्न केले. त्याने ज्योती सिंगसोबत लग्नगाठ बांधली होती. या लग्नात त्याचे कुटुंब आणि काही जवळचे मित्र आले होते. वृत्तानुसार, 2019 मध्ये भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंग हिने त्याच्यासोबत असलेल्या अफेअरचा खुलासा केला होता. या सोबतच तिने असा आरोप केला होता की, पवन सिंगने तिच्या गाण्याला रिलीझ होऊ दिले नव्हते.

अक्षराने माध्यमांसोबत बोलताना असे सांगितले होते की, त्याच्या लग्नाच्या वेळेस तिला काहीही सांगितले होते. लग्नाच्या वेळेस तिला एका रूममध्ये बंद करून ठेवले होते.

अक्षराने असे सांगितले होते की, त्या दोघांचे नाते संपल्यावरही पवनने तिला अनेक वेळा जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांनतर आमच्यात ज्या काही गोष्टी घडल्या त्या कोणापासूनच लपून नाहीत. जेव्हा मी आमच्यातील नाते संपवण्याची गोष्ट समोर आणली, तेव्हा त्याने माझ्यासमोर अनेक अडचणी आणल्या.

पवनच्या करिअरबद्दल बोलायचे झाल्यास, नुकतेच त्याचे नवीन होळीचे गाणे रिलीझ झाले आहे. यातिरिक्त तो ‘वाल घातक’ आणि ‘जहरीला’ या दोन भोजपुरी चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आमिर खान आहे खऱ्या मैत्रीचे मूर्तिमंत उदाहरण; ‘लगान’मधील मित्राची ‘ही’ इच्छा केली पूर्ण

-‘द डर्टी पिक्चर’मधील भूमिकेमुळे प्रचंड घाबरली होती ‘विद्या बालन’, स्क्रीनिंगनंतर घडलेले न विसरण्यासारखे

-तब्बल ३० वर्षांनंतर अनुपम खेर यांचे टॉलिवूडमध्ये कमबॅक, बुमराहच्या कथित गर्लफ्रेंडसोबत करणार ‘या’ सिनेमात काम

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा