Monday, July 8, 2024

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री बनताच पवन कल्याण यांची मोठी घोषणा, चित्रपटातून निवृत्ती घेणार का?

अभिनेता आणि राजकारणी पवन कल्याण (Pawan Kalyan) यांची आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात त्यांनी काल त्यांचा गृह मतदारसंघ पिठापुरम येथे जाहीर सभा घेतली. राज्य विधानसभेत आपला प्रतिनिधी म्हणून निवड केल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. यावेळी सर्वांना जाणून घ्यायचे होते की, उपमुख्यमंत्री झाल्यानंतरही पवन चित्रपटात काम करत राहणार का, त्यामुळे त्यांनी या प्रश्नाचे उत्तरही दिले. या अभिनेत्याचे विधान सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

जाहीर सभेत पवनच्या चाहत्यांचा एक भाग ‘ओजी’ म्हणू लागला, ज्यामुळे त्याला हसू फुटले. यावर अभिनेते-राजकारणीने विचारले, ‘ओजी? मला चित्रपट करायला वेळ मिळेल असे वाटते का?’ त्यानंतर पुन्हा चित्रपटांच्या शूटिंगचा विचार करण्याआधी आपला मतदारसंघ सुधारण्यावर भर द्यायचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, “मी वचन दिले होते. सर्वप्रथम मला हा मतदारसंघ सुधारण्यावर भर द्यायचा आहे. खड्डे न बुजवले किंवा नवीन रस्ते न बांधल्याचा दोष निदान माझ्यावर कुणी ठेवू नये. मी OG च्या शूटिंगमध्ये का व्यस्त आहे असा प्रश्न जर कोणी मला विचारला तर मी काय करू? ही भीती मनात ठेवून मी माझ्या चित्रपट निर्मात्यांनाही सांगितले की तुम्ही मला माफ करा.”

पवन कल्याण पुढे म्हणाले, “मला आधी लोकांच्या सेवेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हाच मी चित्रपटांचे शूटिंग करेन. पवनने त्याच्या चित्रपटाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांना सांगितले की, ‘तुम्ही खरोखरच OG पाहाल, ते चांगले होईल.”

कामाच्या आघाडीवर, पवन कल्याणचे तीन चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. यातीलच एक मोस्ट अवेटेड ‘ओजी’ चित्रपट आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. याशिवाय तो हरी हरा ‘वीरा मल्लू: भाग 1 – तलवार विरुद्ध आत्मा’ चा देखील एक भाग आहे. तमिळ चित्रपट ‘थेरी’ ‘उस्ताद भगत सिंग’च्या तेलुगू रिमेकमध्येही तो दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

२ ॲागस्टला राडा करायला येतोय ‘बाबू’, नवा कोरा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला
कियाराने सिद्धार्थवर केली ‘काळी जादू’, खोट्या बातम्या पसरवून चाहत्याची 50 लाखांची फसवणूक

हे देखील वाचा