Wednesday, October 23, 2024
Home मराठी २ ॲागस्टला राडा करायला येतोय ‘बाबू’, नवा कोरा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

२ ॲागस्टला राडा करायला येतोय ‘बाबू’, नवा कोरा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

अस्सल आगरी कोळी भाषेत आपला जलवा दाखवाणारा स्टायलिश ‘बाबू’ २ ॲागस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बाबू नाय, बाबू शेठ…’ असणाऱ्या ‘बाबू’ची स्टाईलच निराळी असून बाबूची भूमिका साकारणारा अंकित मोहन या चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. ‘बाबू’ची ही झलक नुकतीच सोशल मीडियावर झळकली असून आता प्रेक्षक आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

मोशन पोस्टर पाहूनच हा ॲक्शनपट असल्याचा अंदाज रसिकवर्गाला आला असेल. श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत ‘बाबू’ या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर, बाबू कृष्णा भोईर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे म्हणाले, “मराठी चित्रपटात भावनिकता, विनोद, कमाल कथा या सगळ्यांचा समावेश असतोच परंतु ‘बाबू’ चित्रपटातून जबरदस्त ॲक्शन, स्टाईल, यांचा धमाकेदार संगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यात अंकित मोहन सारखा जबरदस्त हिरो असल्याने हा ‘बाबू’ अधिकच रंगला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘स्टार कीड आणि आमच्यामध्ये भेदभाव केला जातो’, दिग्गज अभिनेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
सिद्धार्थ मितालीची परदेशवारी ! इटलीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

हे देखील वाचा