Monday, June 24, 2024

भोजपुरी सुपरस्टार पवनसिंगचे ब्लॉकबस्टर ‘हरी हरी ओढ़नी’ गाणे लवकरच मिळणार २०० मिलियन व्ह्यूज

भोजपुरी सुपरस्टार पवनसिंग नेहमीच त्याच्या गाण्यांमुळे सतत मीडियामध्ये चर्चेत असतो. पावनसिंगचे गाणे येणार म्हटल्यावर त्याचे फॅन्स देखील खुश असतात. त्याचे गाणे आले की लगेचच गाजण्यास सुरुवात होते. गाण्याला मिलियन व्ह्यूज मिळणार हे आधीच सांगितले जाते. मागच्यावर्षी २०२२ मध्ये त्याचे ‘हरी हरी ओढ़नी’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्याने आधीच अनेक रेकॉर्ड तोडले आहे. आता एकदा पुन्हा या गाण्याने नवीन रेकॉर्ड केले आहे. या गाण्याला लवकरच २०० मिलियन व्हूयज मिळणार आहे. सध्या हे गाणे तुफान गाजत असून, भोजपुरी गाण्यांचे प्रेमी असणाऱ्या लोकांच्या तोंडावर हे गाणे सतत येत आहे. पवनसिंगच्या या गाण्याने २०० मिलियन हिट लिस्ट गाण्यांमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.

हरी हरी गाने गाण्याला आशुतोष तिवारीने लिहिले आहे. या गाण्याला डीआरएस म्यूजिक वर प्रदर्शित केले गेले आहे. २०२२ वर्षातील सर्वात हे गाणे एक ब्लॉकबस्टर गाणे ठरले होते. या गाण्यात पवनसिंग सोबत अभिनेत्री डिंपल सिंगने तिच्या अदा दाखवल्या आहेत. या दोघांनी आधी अनेक गाण्यांमध्ये सोबत काम केले असून, प्रेक्षकांना देखील त्यांची जोडी खूप आवडते. या गाण्यात या दोघांची जोडी कमाल दिसत आहे.

हरी हरी ओढ़नी या गाण्याची निर्मिती धीरज सिंग यांनी केली असून गाण्याला पवन सिंग आणि अनुपमा यांनी आवाज दिला आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर केवळ १९ दिवसांमध्ये गाण्याला १०० मिलियन व्ह्यूज मिळाले होते. हे गाणे ४ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झाले होते. या गाण्याला लोकांची अमाप पसंती मिळत आहे. त्यामुळेच हे गाणे यूटुबवर पाचव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. या गाण्याची कोरिओग्राफी अमित चावला यांनी केली आहे. आतापर्यंत या गाण्याला १८३ मिलियन व्ह्यूज मिळाले आहे. या वेगाने गाण्याला लवकरच २०० मिलियन व्ह्यूज मिळतील यात शंका नाही. पवन सिंगला त्याच्या फॅन्सकडून खूप प्रेम मिळते. काही दिवसांपूर्वीच लवकरच येणाऱ्या होळी या सांवर आधारित त्याचे गाणे प्रदर्शित झाले आहे. ते गाणे देखील यूटुबवर ट्रेंड करत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मल्याळम अभिनेत्री सुबी सुरेश यांचे वयाच्या ४१ व्या वर्षी दुःखद निधन

साऊथ इंडस्ट्रीमधील ‘हे’ दिग्गज अभिनेते किडनी स्टोनवरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल

हे देखील वाचा