Friday, April 19, 2024

‘लोकांना कशाला शिकवण देता, स्वतःकडे बघा’, शिवलीला पाटीलच्या ‘बिग बॉस मराठी’मधील एन्ट्रीवर प्रेक्षकांची नाराजी

‘बिग बॉस मराठी’च तिसरं पर्व सुरू झालं आणि एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली. नियमानुसार शोमध्ये अभिनयासोबतच इतर क्षेत्रातील स्पर्धकांचा देखील समावेश झाला आहे. यावर्षी एका खास व्यक्तीची शोमध्ये एन्ट्री झाली आहे. या वर्षी बिग बॉसचे घर भक्तिमय झाले आहे. याचे कारण म्हणजे, ह.भ. प. शिवलीला पाटील हिने या शोमध्ये प्रवेश केला आहे. तसं पाहायला गेलं, तर शिवलीलाचे क्षेत्र हे खूप वेगळे आणि सांप्रदायिक आहे. बिग बॉसच्या घरात असणारे वातावरण, खेळले जाणारे डावपेच हे तिच्या व्यवसायाच्या अगदी विरुद्ध आहेत. तिने या शोमध्ये सहभाग घेतल्याने तिच्यावर प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे.

शिवलीला ही एक तरुण प्रसिद्ध महिला कीर्तनकार आहे. तिने अनेक कीर्तने करून समाजप्रबोधन केले आहे. खूप लहान असल्यापासूनच तिने कीर्तने केली आहेत. त्यामुळे तिची ख्याती महाराष्ट्रभर पसरली आहे. ‘बिग बॉस’ हा एक लोकप्रिय रियॅलिटी शो आहे. शोला आतापर्यंत प्रेक्षकांनी अमाप प्रेम दिले आहे. शोमधील स्पर्धकांना देखील खूप प्रेम मिळाले आहे. पण या वर्षी शिवलीला हिच्या एन्ट्रीने प्रेक्षक खूप नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर तिला खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. (People troll bigg boss Marathi 3 contestent shivleela patil for entering bigg Boss house)

सोशल मीडियावर एकाने कमेंट केली आहे की, “ताई तुझा निर्णय चुकला.” आणखी एकाने लिहिले आहे की, “कीर्तनकार लोकं देखील बिग बॉसमध्ये येतात, लोकांना कशाला शिकवण देता स्वतःकडे बघा.” दुसऱ्या एकाने “घोर कलियुग,” असे लिहिले आहे. तसेच आणखी एकाने “प्रसिद्धीचे डोहाळे,” अशी कमेंट केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे शिवलीला पाटील हिचे गाव आहे. सोशल मीडियावर ज्यांची कीर्तने प्रसिद्ध आहेत, अशा तरुण कीर्तनकारांमध्ये ह.भ.प. शिवलीला बाळासाहेब पाटीलचे नाव घेतले जाते. शिवलीलाच्या कीर्तनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. संत साहित्य, संस्कृती आणि सद्य विषयांवर शिवलीला कीर्तन करते. शिवलीलाचे वडील बाळासाहेब पाटील कीर्तनकार आहेत. घरातूनच तिला कीर्तनाचे बाळकडू मिळाले आहे. वयाच्या पाचव्या वर्षी शिवलीला कीर्तन करू लागली. त्यानंतर तिने अनेक गावात कीर्तने केली. तिच्या कीर्तनाला प्रतिसाद मिळू लागला. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत शिवलीलाने ग्रामीण आणि शहरी भागात स्वतःचा चाहतावर्ग बनवला. आता तिचे नाव प्रसिद्ध कीर्तनकरांच्या यादीत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आम्ही दोघांनी अजूनही लग्न नाही केले’, म्हणत सलमान खानने केला आयुष्यातील खऱ्या प्रेमाचा खुलासा

-TMKOC: एकेकाळी कर्जात पूर्णपणे बुडाला होता ‘सोढी’; मग कर्जदारांपासून वाचण्यासाठी केलं ‘हे’ काम

-लग्नानंतर प्रथमच बिकिनीमध्ये दिसली दिशा परमार; मालदीवमध्ये पती राहुलसह करतेय सुट्ट्या एन्जॉय

हे देखील वाचा