Tuesday, July 9, 2024

रणवीरचे न्यूड फोटोशूट काढणारा फोटोग्राफर आहे तरी कोण? ३ तास दीपिकाच्या पतीला ठेवलं होतं उघडं

माध्यमांमध्ये सर्वाधिक रंगलेला विषय कोणता असेल, तर तो म्हणजे रणवीर सिंग आणि त्याचे बोल्ड फोटोशूट होय. रणवीरच्या न्यूड फोटोशूटमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. कुणी त्याच्या फोटोशूटला पाठिंबा देत आहे, तर कुणी त्याच्या फोटोशूटवरून ट्रोल करत आहे. काहीजण तर चक्क त्याच्याविरुद्ध पोलीस तक्रारही करत आहेत. अशात चाहत्यांना त्याच्या फोटोशूटबद्दल खूप काही जाणून घ्यायचे आहे. अशात माहिती समोर येत आहे की, रणवीरचे हे फोटोशूट फोटोग्राफर आशिष शाह याने केले आहे. कोण आहे हा फोटोग्राफर चला जाणून घेऊया…

कोण आहे आशिष शाह?
आशिष शाह (Photographer Ashish Shah) हा प्रसिद्ध फोटोग्राफर आहे. तो डेहराडून येथील रहिवासी आहे. असे म्हटले जाते की, आशिषच्या फोटोग्राफीमध्ये देसी झलक पाहायला मिळते. त्यामुळे त्याच्या फोटोंना जागतिक स्तरावर पसंती मिळते. १८५४ फोटोग्राफीच्या एका रिपोर्टनुसार, दरवर्षी ब्रिटिश जर्नल ऑफ फोटोग्राफी (BJP- British Journal of Photography) हे निवडक २० फोटोग्राफर्सची यादी काढतात, ज्यामध्ये आशिष शाह याच्याही नावाचा समावेश झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

आशिषचे बॉलिवूड कनेक्शन
सध्या आशिष रणवीर सिंगच्या फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी आशिषने राधिका आपटे हिच्यासोबतही काम केले आहे. आशिषने मॅगझिन वोगच्या कव्हर पेजसाठी राधिकासोबत काम केले होते आणि तिचे फोटोशूट केले होते. काही काळापूर्वी त्याने सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांचेही काही फोटो आशिषने काढले होते. या फोटोंमध्ये सोनम कपूरचे बेबी बंप दिसत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashish Shah (@ashishisshah)

तब्बल ३ तास उघडा होता रणवीर
अभिनेता रणवीर सिंगचे फोटोशूट व्हायरल झाल्यानंतर आशिष शाह याने माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान त्याने सांगितले की, रणवीरचे फोटोशूट वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओमध्ये झाले. हे फोटोशूट करण्यासाठी तब्बल ३ तासांचा वेळ लागला. रणवीरच्या फोटोशूट कल्पनेवर आशिष म्हणाला की, “मला फक्त एवढेच सांगितले गेले होते की, हा फोटो बर्ट रेनॉल्ड्ससाठी एक श्रद्धांजली असला पाहिजे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashish Shah (@ashishisshah)

आशिषबद्दल महत्त्वाची बाब अशी की, पेपर मॅगझिनसाठी किम कार्दशियन हिच्या फोटोशूटच्या वेळीही आशिष शाह शूटिंग सेटवर उपस्थित होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
दिशा आणि टायगरचे नाते तुटले? अभिनेत्याच्या जवळच्या मित्रानेच सांगितले ब्रेकअपबद्दल खरं काय ते
विषयच खोल! ‘हा’ भोजपुरी स्टार वडिलांच्या परवानगीशिवाय घेत नाही अभिनेत्रीची किस, निर्मात्यांना थेट सांगतो…
कारगिल युद्धावर आधारित ‘हे’ ५ सिनेमे पाहिलेत का? पाहून तुमचीही छाती गर्वाने फुगेल

हे देखील वाचा