Tuesday, March 5, 2024

तब्बल 25 वर्षाच्या संघर्षानंतर पोकेमॉनने पटकवला ‘वर्ल्ड चॅम्पिय’नचा खिताब

प्रसिद्ध कार्टुन ‘पोकेमॉन‘ याने लहाण मुलांसोबत मोठ्या माणसालाही वेड लावले होते. यावर अनेक चित्रपट देखिल बनले आहेत. पोकेमॉन ॲनिमे मालिकेतील मुख्य भूमिका करणारा ॲश केचम याला अनेक प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती, यानेअनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवले आहे. नुकतंच या मालिकेला अनुसरुन एक बातमी समोर येत आहे.

पुर्ण 25 वर्षानंतर पोकेमॉन मालिकेमधील मुख्य भूमिका करणारा ॲश केचम (Ash Ketchum) जगविजेता बनला आहे. त्याने नुकतंच जगातील सर्वात महान पोकेमॉन ट्रेनरचा किताब जिंकला आहे. ही बातमी पोकेमॉनच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन शेअर केली आहे. त्यामुळे ही पोस्ट सोशल मीडिवर तुफान व्हायरल होत आहे. पोकेमॉन प्रेमींनी या पोस्टवर कमेंटचा वर्षाव केला आहे. बातमी शेअर करत असताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “त्याने हे केले! ॲश वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे!” या पोस्टला आतापर्यत 4.3 मिलियन व्ह्युज मिळाले असून 3.6 लाख शेअर मिळाले आहेत.

पोकेमॉन ही एक ॲनिमेटेड सिरिज असून “पोकेमॉन अल्टिमेट जर्नीज: द सीरीज” (Pokémon Ultimate Journeys: The Series) याचे पूर्ण नाव आहे. यांनी शुक्रवारी (दि, 10 नोव्हेंबर) दिवशी जपानमध्ये प्रदर्शित झालेल्या वर्ल्ड कॉरोनेशन आठव्या स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. शेवटचा सामना ॲश आणि लिओन यांच्यामध्ये झाला होता. या वेबसिरिजचे एकूण चार भाग धनाकेदार चालले आहेत. नकतयाच प्रदर्शित झालेल्या सिझनमध्ये ब्रॉक, मिस्टी आणि डॉन या भूमिका प्रेत्रकांच्या पसंतीस अतरल्या आहेत.

या सिरिजच्या अमेरिक वेबसिरिजला ॲशसाठी आवाज देणारी अभिनेत्री सारा नॅटो (Sarah Natochenny) यांनी देखिल आपली भावना व्यक्त करत ट्वीट केले आहे की, पोकेमॉनच्या इंग्रजी डब भाग जगासोबत शेअर केरण्यासाठी मी प्रतिक्षा करु शकत नाही. ॲश केचमला आवाज देणे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. त खरच सर्वोत्कृष्ट आहे त्याच्यासारखा कोणीही नव्हता.” ॲश हे कार्टून फिक्शन कॅरेक्टर असलं तरी प्रेक्षकांसाठी हृदयस्पर्शी आहे. त्यासोबतच अनेकजानांनी आपल्या प्रतिक्रिया ट्वाटरद्वारे शेअर केल्या आहेत.

टेलिव्हिजनवरील हा कार्यक्रम व्हिडिओ गेम आणि कार्टुनसारखे दाखवाचे. याचे 12,000 हून अधिक भाग प्रदर्शित करण्यात आले. जेव्हा ॲश 1997 मध्ये आपला 10 वा वाढदिवस साजरी करत असताना पिकाचू पिवळ्या रंगाची गिलहरी पाहतो तेव्हापासून या सिरिजमध्ये त्याचा पोकेमॉन बनवण्याचा संघर्ष दाखवला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रियंका चौधरीच्या नॉमिनेशनवर प्रेक्षकांनी ठोकला अंदाज, ‘बिग बॉस’TRP साठी का निर्मात्याने लढवली शक्कल?
वेस्टर्न लूकमध्ये तेजश्रीच्या हटके अदा, पाहून तुम्हीही व्हाल फिदा

हे देखील वाचा