Monday, February 26, 2024

शेतकऱ्याचा लेक! म्हणत राजू शेट्टींनी प्रविण तरडेला दिल्या हटके शुभेच्छा, केक घेऊन थेट घरी…

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमधील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर वेगळीच छाप सोडणारे प्रसिद्ध अभिनेता प्रविण तरडे. त्यांनी अनेक प्रकारच्या भूमिकामध्ये आपली वेगळीच छाप सोडली. ‘मुळशी पॅटर्न’ असो किंवा ‘धर्मवीर’, ‘हंबीररीव’ सारख्या अनेक चित्रपटामध्ये त्यांनी आपली धमक दाखवून दिली. ते सतत संस्कृती आणि परंपरालर विशेष वक्तव्य करत असतो. शुक्रवार (दि. 11 नोव्हेंबर) दिवशी आपला 48वा वाढदिवस साजरी करत आहेत, त्यानिमित्ताने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अभिनेत्याला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता प्रविण तरडे (Pravin Tarde) याने सतत आपल्या सोशल मीडियावर फोटो शेअर करुन आपले शेतीविषयी प्रेम दाखवून दिले आहे. त्याचप्रमाने प्रविण सतत शेतकऱ्यांच्या मदतीला पाठिंबा देत असतो. शेतकऱ्यांचा आवाज म्हणून ओळखले जाणारे स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. राजू शेट्टी हे राजकारणामधील मोठे नाव आहे. शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन ते सतत सरकारवर टीका करत असतात. त्यांनी नुकतं त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर प्रविण तरडेसोबतचा फोटो शेअर केला असून त्यामध्ये ते अभिनेत्याला केक चारताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

या फोटोला शेअर करत असाना राजू यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ”शेतक-यांच्या प्रश्नावर नेहमी आंदोलन, मोर्चे, पदयात्रा याकाळात गेल्या अनेक वर्षापासून माझ्यासोबत असणारे, चित्रपटातील यशस्वी नाव, शेतक-यांचा मुलगा व अभिनेता प्रविण तरडे यांचा आज ४८ वा वाढदिवस त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी साजरा केला,”असे त्यांनी पोस्ट द्वारे सांगितले आहे.

आज तरडे यांचा वाढदिवस असल्यामुळे कलाक्षेत्रातून तर शुभेच्छांचा वर्षावर तर होतच आहे पण राजकारण क्षेत्रातही त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत हे सगळे पाहून त्यांच्या चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे. राजू शेट्टी थेट अभिनेत्याच्या घरी केक घेऊन जाणं ही साधी गोष्टी नाही. राजू शेट्टी अभिनेत्याचे चांगले मित्र असून त्यांचे सगळे चित्रपट आवर्जून पाहात असतात. त्यांची मैत्री पाहून चाहत्यांनीदेखिल शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा 
हेही वाचा-
रसिका सुनिल उर्फ शनायाच्या फोटोंनी सोशल मीडियाचे वाढवले तापमान, फोटोंवर चाहत्यांनी केला कमेंटचा वर्षाव
ब्रेकिंग! अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचे वयाच्या 46 व्या वर्षी निधन

हे देखील वाचा