Wednesday, April 17, 2024

राजकारणातून सिनेमात! रामदास आठवले आणि राजू शेट्टी झळकणार ‘या’ मराठी चित्रपटात

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच या राजकीय घडामोडींची चर्चा मनोरंजन जगतातही होताना दिसत आहे. सध्या मी पुन्हा येईन वेबसिरीज चर्चेत असतानाच आता महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन धुरंधर व्यक्तिमत्व चित्रपटात झळकणार आहेत. राजू शेट्टी (Raju Shetty) आणि रामदास आठवले (Ramdas Athavle) हे ते दोन नेते असून दोघेही ‘राष्ट्र एक रणभूमी’ या चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहेत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

केंद्रिय मंत्री रामदास आठवले हे देशाच्या राजकारणातील एक दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. राजकारणासोबतच एक प्रसिद्ध कवी आणि दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मिश्किल आणि विनोदी कविता नेहमीच राजकीय मैदानात चर्चेचा विषय ठरत असतो. रामदास आठवले यांच्याप्रमाणेच राजू शेट्टी हे देखील शेतकरी नेते म्हणून ओळखले जातात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी एक लढवैय्ये नेते आहेत. त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असलेले राजू शेट्टी एक लोकप्रिय लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. आता राज्याच्या राजकारणातील हे दिग्गज नेते चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहेत.

‘राष्ट्र एक रणभूमी’ या चित्रपटात हे दोन्ही नेते भूमिका साकारताना दिसणार आहेत. कोरोना काळामुळे लांबणीवर गेलेला हा चित्रपट आता २६ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रामदास आठवले, राजू शेट्टी यांच्यासोबतच विक्रम जोशी, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, संजय नार्वेकर, मिलींद गुणाजी असे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. या चित्रपटाची आता प्रेक्षकांना जोरदार उत्सुकता लागली आहे. दिग्गज कलाकारांची मांदियाळी आणि रामदास आठवले तसेच राजू शेट्टी यांच्या भूमिकांमुळे हा चित्रपट जोरदार ठरणार अशी चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगली आहे.

हेही वाचा – धक्कादायक! ३७ वर्षीय अभिनेत्याची गळफास घेत आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये सांगितले कारण

श्वेता तिवारीच्या एक्स पतीने ‘बिग बॉस’ फेम श्रद्धा शर्माला केलीये मारपीट, अभिनेत्रीचे वक्तव्य चर्चेत

फक्त ‘रामसेतू’च नव्हे अक्षय कुमाारच्या ‘या’ चित्रपटांनाही झाला होता जोरदार विरोध, हिंदू संघटनांच्या आला होता निशाण्यावर

 

 

 

हे देखील वाचा