कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली‘ (Sundara Manamadhe Bharali) मालिका चांगलीच गाजत आहे. मालिकेतील डायलॉग, पात्र सगळ्यांना प्रामुख्याने आवडतात. सगळी पात्र देखील लेखकाने अत्यंत उत्कृष्टरित्या रेखाटली आहेत. प्रत्येक पात्राला एक विशेष महत्व आहे. त्यांचे डायलॉग देखील खूप उत्तम आहेत. सगळीच पात्र प्रेक्षकांना खूप आवडतात. अशातच अशी माहिती समोर आली आहे की, मालिकेतील एक अभिनेत्री प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत.
मालिकेतील मुख्य भूमिकेत असणारी पात्र जेवढी गाजत आहेत. तेवढीच मालिकेतील खलनायक देखील गाजत आहेत. मालिकेत कामिनी उर्फ मिस नाशिक हे पात्र निभावणारी अभिनेत्री पूजा पुरंदरे या मालिकेचा निरोप घेत आहे. याची माहिती तिने सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. तिने मालिकेतील टीमसोबत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही बातमी दिली आहे. (pooja purandare leave sundra manamadhe bharali serial)
तिने हे फोटो शेअर करून लिहिले आहे की, “Hi friends, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून मी निरोप घेतला आहे. ‘कामिनी’ उर्फ ‘मिस नाशिक’ हे पात्र साकारताना खूप मजा आली. तुम्हा सर्वांकडून या पात्राला खूप प्रेम मिळाले. ‘सुंदरा’च्या सगळ्या टीमबरोबर हा प्रवास मस्त झाला. चॅनल, निर्मिती संस्था, लेखिका, दिग्दर्शक, सहकलाकार, टेक्निकल टीम अणि प्रेक्षक. सर्वांचे मनापासून आभार, पुन्हा लवकरच भेटू.”
मालिकेतील तिचे पात्र सगळ्यांना खूप आवडले होते. खलनायकाच्या भूमिकेत असून देखील प्रेक्षकांनी तिला खूप प्रेम दिले होते. तिचे डायलॉग आणि ड्रेसिंग प्रेक्षकांना खूप आवडत होते. अशातच तिची मालिकेतून एक्झिट झाल्याने तिच्या चाहत्यांना दुःख झाले आहे. आता तिच्या जागी कोणती अभिनेत्री येईल याची माहिती समोर आली नाही. तसेच येणारी अभिनेत्री कोण असेल आणि प्रेक्षक तिला लगेच स्वीकारतील का? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. याआधी माळियेक्त हेमा हे पात्र निभावणारी अभिनेत्री प्रमिती नरके हिने मालिकेचा निरोप घेतला आहे.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत अक्षया नाईक आणि समीर परांजपे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. मालिनीची कहाणी काहीशी वेगळी आणि दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. त्यामुळे प्रेक्षकांना देखील मालिका खूप आवडत आहे.
हेही वाचा :
‘हमारा आदमी का ढाप्या नहीं है’, म्हणत हेमांगी कवीने केला तिचा रावडी लूक शेअर
अभिमानास्पद! गायक मोहित चौहान बनले मंगोलियाचे सांस्कृतिक दूत, दिल्लीत राजदूताने दिले नियुक्तीचे पत्र
‘आर्या २’ वेब सिरीजचे पोस्टर शेअर करत सलमान खानने केले सुष्मिता सेनचे कौतुक