Friday, July 5, 2024

पूजा सावंतच्या हॉट फोटोशूटने वाढवले चाहत्यांच्या काळजाचे ठोके, एकदा पाहाच

मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत होय. पूजा सावंतने चित्रपटसृष्टीमध्ये तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तिचा अभिनय‌ आणि नृत्य पाहता क्षणीच सगळे तिच्या प्रेमात पडतात. तसेच पूजा सावंत सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्यामुळे तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे. पूजाचे चाहते देखील तिच्या प्रत्येक फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत असतात. अशातच तिचे काही मनमोहक फोटो शेअर केले आहेत.

पूजाने सोशल मिडीया अकाऊंटवरून काही फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकती की, तिने पांढरा आणि क्रीम कलरचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. यावर तिने डायमंडचे कानातले घातले आहेत. ज्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. यामध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. तिचे चाहते या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. अनेकांना हे फोटो खूप आवडले आहेत.

पूजा नेहमीच तिचे वेगवेगळे फोटो शेअर करत असते. तिचे फोटो सगळ्यांना खूप आवडतात. तिने आता शेअर केेलेला फोटो सोशल मि़डीयावर अनेकांना आवडत आहे.

पूजा सावंतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून २०१० मध्ये चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. या चित्रपटात तिने भरत जाधव, सिद्धार्थ जाधव  या कलाकारांसोबत काम केले होते. त्यानंतर तिने ‘दगडी चाळ’, ‘लपाछपी’, ‘झकास’, ‘नीलकंठ मास्टर’, ‘चिटर’, ‘वृंदावन’, ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटात काम केले आहे. पूजा सावंत तिच्या डान्ससाठीही खूप लोकप्रिय आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा