Monday, March 4, 2024

‘मला भेट असे मेसेज एक मुलगा सतत करायचा आणि…,’ जाणून घ्या रितिका श्रोत्रीच्या आयुष्यातील ‘तो’ किस्सा

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रितिका श्रोत्री. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. रितिकाने कमी वयात खूप प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. सध्या रितिका तिच्या आगामी ‘बॉईज 4’ चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.

रितिका (Ritika Shrotri ) नुकतीच माध्यमांशी बोलताना म्हणाली की, “माझ्या कॉलेजमध्ये एक मुलगा होता. तो मला सतत मेसेज करायचा. तो मला भेटण्याची इच्छा व्यक्त करायचा. माझ्या मित्रांना त्याच्यावर राग आला आणि त्यांनी त्याची मस्करी करण्याचा निर्णय घेतला. ते माझ्या मोबाईलवरून त्याच्याशी रितिका म्हणून बोलू लागले. त्यांनी त्या मुलाला भेटायला बोलावले आणि त्याला सांगितले की मी त्याला भेटायला येणार आहे.”

पुढे बोलताना तिने सांगितले की, “तो मुलगा ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी केक घेऊन आला होता. पण मी तिथे नव्हते. नंतर मी त्या मुलाला मेसेज करून माझे मित्र तुझ्याशी बोलत होते हे खरं सांगितलं आणि त्याला सॉरी म्हटलं. त्या मुलाच्या मनात काहीही खोट नव्हती. त्याला फक्त मला भेटायचं होतं त्यामुळे मला त्याचं वाईट वाटलं.” असे ही ती म्हणाली.

रितिकाने या घटनेसाठी चाहत्याची माफी मागितली आहे. तिने सांगितले की, “मला त्या मुलाच्या भावना समजल्या. मी त्याला दुखावले हे मला वाईट वाटते. मी त्याला भेटून त्याची माफी मागणार आहे.” रितिका श्रोत्री ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने ‘बॉईज’, ‘बॉईज 2’, ‘बॉईज 3’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘बॉईज 4’ यांचा समावेश आहे. (Popular actress Ritika Shrotri narrated the story from college)

आधिक वाचा-
राणी मुखर्जीला नवरंगांची भुरळ! पांढऱ्या साडीत खुलल सौंदर्य
सर्वांच्या लाडक्या पूजा-वैभवचा ‘एक लाजरा नं साजरा मुखडा…’ गाण्यावरचा रोमँटिक डान्स पाहिला का? व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा