Friday, March 29, 2024

मराठमोळ्या रितिका श्रोत्रीचा हॉट अंदाज! पाहायला मिळाले ‘शॉर्ट्समध्ये काही शॉट्स’

रितिका श्रोत्री ही मराठी सिनेसृष्टीतील प्रतिभावान कलाकारांपैकी एक आहे. याची झलक तिने माधुरी दीक्षित अभिनित ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटात दाखवली आहे. या चित्रपटात तिच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले होते. ती चाहत्यांमध्ये तिच्या निरागस सौंदर्यासाठी ओळखली जाते. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील बरीच सक्रिय असते. नेहमी आपले सुंदर सुंदर फोटो ती चाहत्यांसमोर सादर करत असते.

नुकतेच रितिकाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत, यात चाहत्यांना अभिनेत्रीचा हॉट अंदाज पाहायला मिळाला आहे. हे एकूण तीन फोटो आहेत, जे अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. यात रितिका कमालीची सुंदर दिसत आहे. यात तिने हुडी आणि शॉर्ट्स घातले आहेत. सोबतच ती फोटोसाठी दिलखुलास अंदाजात पोझ देताना दिसली आहे. (ritika shrotri shared few shots in shorts)

हे हॉट फोटो शेअर करत, रितिकाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “शॉर्ट्समध्ये काही शॉट्स!” तुम्ही पाहू शकता की, कशाप्रकारे चाहते फोटोवर कमेंट करून अभिनेत्रीचं कौतुक करत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लाल हार्ट ईमोजीचा पाऊस पडलेला सहज पाहू शकता. तसेच या फोटोवर आतापर्यंत ६५ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.

रितिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘गुंतागुंत हृदय’ या मालिकेत बालकलाकाराची भूमिका साकारून, अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर ती बऱ्याच मालिकांमध्ये दिसली. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटाद्वारे ती प्रथमच रुपेरी पडद्यावर झळकली. तसेच २०१५ साली आलेल्या ‘स्लॅमबुक’ चित्रपटात तिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. याशिवाय रितिका लवकरच ‘डार्लिंग’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जस्सी’ म्हणून झाली लोकप्रिय, तर अश्लील एमएमएस लीक झाल्यामुळे मोना सिंग सापडली होती वादात

-‘हिंदी मीडियम’ फेम सबा कमरला मशिदीत डान्स करणं पडलं महागात, पाक कोर्टाने दाखल केली एफआयआर

-शमिता शेट्टीला ‘आंटी’ म्हणणे करण कुंद्राला पडले महागात, अभिनेत्रीच्या आईने केली कानउघडणी

हे देखील वाचा