Wednesday, July 3, 2024

Shocking | प्रभासच्या ‘डाय-हार्ट’ फॅनने केली आत्महत्या, कारण वाचून तर सरकेल तुमच्याही पायाखालची जमीन

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) यांचा बहुचर्चित ‘राधे श्याम’ हा सिनेमा सिनेमागृहात रिलीझ झाला आहे. पण, चित्रपट प्रदर्शित होण्याआधी ज्याप्रकारे चर्चा होती आणि प्रेक्षकांच्या त्याच्याकडून ज्या अपेक्षा होत्या, आता त्या सगळ्या मोडीत निघताना दिसत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा नकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जो अभिनेत्याच्या एका डाय हार्ट फॅनला (Prabhas Die-heart fan suicide) सहन झाला नाही आणि त्याने मृत्यूला कवटाळले. ही धक्कादायक बाब आंध्र प्रदेशातून समोर आली आहे.

खरं तर, प्रभासचे देशातच नाही, तर जगभरात जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. अशा परिस्थितीत प्रेक्षक त्याच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहतात. दरम्यान, आता त्याच्या एका २४ वर्षीय चाहत्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. हे प्रकरण आंध्र प्रदेशातील टिळकनगरचे आहे, जे कर्नूल जिल्ह्यांतर्गत येते. रवी तेजा असे या व्यक्तीचे नाव आहे. असे सांगितले जात आहे की, तो अभिनेता प्रभासचा डाय हार्ट फॅन होता. (prabhas radhe shyam gets mixed response a fan acommitted suicide)

अशातच ‘राधेश्याम’ हा सिनेमा रिलीझ झाला आणि त्याला नकारात्मक प्रतिक्रिया मिळू लागल्या, तेव्हा रवीने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी त्या व्यक्तीने आपल्या आईला चित्रपटाच्या रिव्ह्यूबद्दल सांगितले होते. तर, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

प्रभासच्या ‘राधेश्याम’ला संमिश्र प्रतिसाद मिळाल्यानंतरही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांकडून खूप पसंत केल्या जात आहेत. त्याचबरोबर चित्रपटातील काही पात्रेही निराश करतात. पण प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या धमाकेदार केमिस्ट्रीने चाहत्यांना चित्रपटात खिळवून ठेवले आहे. यासोबतच ‘राधेश्याम’चे संगीतही जबरदस्त आहे, ज्यामुळे चित्रपट मजबूत होतो.

प्रभास आणि पूजा हेगडे यांचा ‘राधेश्याम’ राधा कृष्ण कुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. या व्यतिरिक्त अभिनेत्री भाग्यश्री, सत्यराज, कृष्णम राजू, जगपती बाबू, सचिन केडकर, प्रियदर्शी, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर आणि जयराम या कलाकारांच्याही या पीरियड रोमँटिक ड्रामा चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा