Thursday, June 13, 2024

डान्सर प्रभुदेवा चौथ्यांदा बनला बाबा! पत्नी हिमानीने दिला चिमुकल्या परीला जन्म, कोरिओग्राफरला याआधी 3 मुले

प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर प्रभुदेवा हे चौथ्यांदा बाबा बनले आहेत. त्यांची दुसरी पत्नी हिमानी सिंग हिने मुंबईत एका मुलीला जन्म दिला आहे. वयाच्या 50 व्या वर्षी प्रभू देवा पुन्हा बाप बनले असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

प्रभू देवा यांची दुसरी पत्नी हिमानी या व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट असून प्रभू देवा आणि त्यांनी 2020 मध्ये गुपचूप लगीनगाठ बांधली होती. ( prabhu deva second wife Himani gives birth to baby )

प्रभू देवा यांनी पुन्हा एकदा वडील झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून आनंद व्यक्त केला आहे. प्रभू देवा यांना आधीच्या लग्नापासून तीन मुलगे होते. सध्या तो मुलीच्या जन्माने उत्साही असून शक्य तितका वेळ घरी कुटुंबासोबत घालवणार, असल्याचे सांगितले.

प्रभुदेवाची दुसरी पत्नी हिमानी सिंग या मुंबईतील फिजिओथेरपिस्ट आहेत. 2020 मध्ये दोघांनी लग्न केले आणि 2023 मध्ये एका मुलीचे आई-वडील झालेत. माध्यमांतील अनेक वृत्तांनुसार, प्रभुदेवाने आधी 2011 मध्ये पहिली पत्नी रामलतशी घटस्फोट घेतल्यानंतर नयनताराला डेट केले होते. ते अगदी लग्नाच्या मार्गावर होते परंतु नंतर असे काही घडले नाही. प्रभू देवा नुकताच तामिळ चित्रपट बघीरा (2023) मध्ये दिसला होता.

अधिक वाचा –
– “ड्रग्जच्या व्यसनाधीनतेसाठी ओळखला जाणारा अभिनेता श्रीरामाच्या भुमिकेत…”, कंगना खवळली, वाचा बातमी
– लई भारी! अभिनयाचे शहेनशहा 32 वर्षांनी एकत्र येणार, ‘या’ चित्रपटात झळकणार सुपरस्टार अमिताभ आणि रजनीकांत

हे देखील वाचा