Sunday, April 14, 2024

“ड्रग्जच्या व्यसनाधीनतेसाठी ओळखला जाणारा अभिनेता श्रीरामाच्या भुमिकेत…”, कंगना खवळली, वाचा बातमी

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा बिनधास्त व्यक्तव्यांमुळे चर्चेत असते. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती एक बेधडक आणि स्पष्टवक्ता स्त्री देखील आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना नेहमीच तिचे मत मांडत असते.

अनेकदा कोणत्या ना कोणत्या बॉलिवूड स्टारला टोमणे मारणाऱ्या कंगनाने पुन्हा एकदा अभिनेत्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी ‘पंगा क्वीन’चे टार्गेट दुसरे कोणी नसून रणबीर कपूर आणि करण जोहर आहेत. पण तुम्ही विचार करत असाल की रणबीरने असे काय केले आहे. जे कंगनाने त्याचे नाव न घेता शेअर केले आहे.

गेल्या काही दिवसांत अशी बातमी आली होती की, नितेश तिवारीच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर भगवान रामाची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामुळे रणबीरचे चाहते ही बातमी एकून खूश झाले होते. तर कंगनाला (Kangana Ranaut) त्याची ही भूमिका अजिबात आवडली नाही. इतकच नाही तर कंगनाने नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. यावेळी तिने करण जोहरवर देखील निशाणा साधला आहे.

कंगनाने करण जोहरला (Karan Johar) महाभारतातील ‘शकुनी मामा’ आणि रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) ‘दुर्योधन’ म्हटले आहे. त्याचवेळी तिने रणबीर आणि करणनेच सुशांत सिंग राजपूत विरुद्ध सर्व बनावट माहिती व्हायरल केल्याचे म्हटले आहे. कंगनाने करण आणि रणबीर कपूरवर तिच्याविरुद्ध सर्व प्रकारच्या खोट्या अफवा पसरवल्याचा आरोप केला आहे.

कंंगना म्हणाली की, त्यांनी तिच्या आणि हृतिक रोशनच्या भांडणात जबरदस्तीने रेफरीची भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला. पण सध्या तिच्याकडे कोणतेही पद नाही, परंतु जेव्हा ती सत्तेवर येईल. तेव्हा ती या लोकांच्या सर्व करस्थान सर्वांसमोर आनेल, असा दावा तिने केला आहे.

कंगना राणौतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कंगना शेवटची ‘धाकड’ चित्रपटात काम करताना दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. कंगना पुढे ‘इमरजेंसी’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कंगना अभिनयासोबतच दिग्दर्शकाच्या भूमिकेतही दिसणार आहे. हा चित्रपट देशातील सर्वात मोठ्या राजकीय घटनेवर आधारित आहे, ज्यामध्ये कंगना इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. (Actress Kangana Ranaut leveled serious allegations against Ranbir Kapoor and Karan Johar)

अधिक वाचा-
‘आदिपुरुष’ चित्रपट पाहताना ‘हनुमानजी’च्या शेजारील सीट बुक करण्यासाठी लागणारं दुप्पट पैसे? निर्माते म्हणाले..
हिंदी चित्रपटातील पहिली अभिनेत्री होती ‘पद्मिनी’, भारत-चीन युद्धादरम्यान केले होते ‘हे’ खास काम । Padmini Birthday 

हे देखील वाचा