Monday, June 24, 2024

काय सांगता! प्राजक्ता माळी करणार २०२२ मध्ये लग्न? फोटो शेअर करून दिली गोड बातमी

उत्कृष्ट सूत्रसंचालिका, अभिनेत्री आणि आता उत्कृष्ट कवयित्री म्हणून लोकप्रिय असणारी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी होय. अनेक मालिकांमध्ये, चित्रपटात काम केल्यानंतर प्राजक्ताचे अभिनय क्षेत्रात एक वेगळेच स्थान निर्माण झाले आहे. आलेल्या प्रत्येक भूमिकेला तिने न्याय दिला आहे. म्हणूनच ती चाहत्यावर्गात सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या देखण्या आणि सोज्वळ रूपाचे दर्शन ती तिच्या चाहत्यांना वारंवार देत असते. नुकतेच तिने तिची स्वतःची निर्मिती संस्था चालू केली आहे. याची माहिती तिने सोशल मीडियावर दिली होती. अशातच तिने आणखी एक गोड बातमी चाहत्यांना दिली आहे.

ही गोड बातमी म्हणजे २८ जानेवारीला प्राजक्ता लग्न बंधनात अडकणार आहे. हो अगदी बरोबर ऐकलंत! प्राजक्ता लवकरच लग्न करणार आहे. फरक फक्त एवढाच की, ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात नाही, तर आगामी चित्रपटात लग्नबंधनात अडकणार आहे. प्राजक्ताने तिच्या आगामी चित्रपटाची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. तिच्या या चित्रपटाचे नाव ‘लकडाऊन’ असे आहे. या चित्रपटाचे पोस्टर तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Prajakta mali give good news on social media)

या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, एक जोडपे सप्तपदी घेताना दिसत आहे, परंतु त्या दोघांनी मास्क लावला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष रामदास मांजरेकर हे आहेत. या पोस्टरवर एक संपूर्ण फॅमिली फिल्म असे लिहिले आहे. हा पोस्टर शेअर करून तिने लिहिले आहे की, “माझ्या आगामी चित्रपटाची मी घोषणा करत आहे. हा चित्रपट २८ जानेवारी, २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. मी खूप उत्सुकतेने वाट बघत आहे. लॉकडाउनच्या काळात लकडाऊनची बाजी, २८ जानेवारीला येतोय अंकुश, प्राजक्ता होणार का राजी?” या चित्रपटात प्राजक्ता माळी आणि अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

त्यांच्या या पोस्टरवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. प्राजक्ता एका मागून एक तिच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का देत आहे. तिचा हा चित्रपट पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. अनेकजण तिच्या या नवीन प्रोजेक्टला शुभेच्छा देत आहेत.

प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेमध्ये काम केले आहे. या मालिकेमधून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील तिच्या साध्या, भोळ्या आणि सालस स्वभावाने सगळ्यांच्या मनावर राज्य केले. तसेच तिने ‘खो-खो’ या चित्रपटात काम केले आहे. ती सध्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे ‘प्राजक्तप्रभा’ हे पुस्तक प्रदर्शित झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-परीची निरागसता अन् नेहाचा समजूतदारपणा, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील बीटीएस व्हिडिओ व्हायरल

-निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अगदी प्रिन्सेस दिसतेय संस्कृती बालगुडे, ग्लॅमरस अदावर तुम्हीही व्हाल फिदा

-गायिका शाल्मली खोलगडेने बॉयफ्रेंड फरहान शेखसोबत बांधली लगीनगाठ, मोजक्या लोकांच्या उपस्थित केले लग्न

हे देखील वाचा