Tuesday, June 25, 2024

प्राजक्ता माळीने लग्नाबद्दल विचारला श्री श्री रविशंकर यांना प्रश्न, व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली, ‘आपल्याला उत्तर मिळालंय’

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. ती सतत या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहून तिच्या व्यवसायिक आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित विविध माहिती शेअर करत असते. मागच्याच महिन्यात प्राजक्ताने उद्योगक्षेत्रात उडी मारत तिचा ‘प्राजक्ताराज’ नावाचा दागिन्यांचा नवीन ब्रँड चालू केला. ती या या ब्रॅंडमुळे तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. अशातच आता पुन्हा एकदा प्राजक्ता तिच्या एका पोस्टमुळे चांगलीच लाइमलाईट्मधे आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

झाले असे की प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती योगगुरू श्री श्री रवी शंकर यांच्या सत्संगात बसलेली दिसत असून, तिने गुरूंना एक प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नावर श्री श्री रवी शंकर यांनी देखील अतिशय दिलखुलास उत्तर दिले आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती गुरूंना विचारते, “लग्न करणे गरजेचेच आहे का?” तिच्या या प्रश्नावर श्री श्री रविशंकर यांनी हसून अगदी सुंदर उत्तर देत सांगितले, “लग्न करणे गरजेचेच आहे का?” हे तू मला विचारत आहेस. असे असते तर कधीच माझ्या बाजूला अजून एक खुर्ची लागली असती. लग्न केलेच पाहिजे हे काही गरजेचे नाही. खूश राहणे महत्त्वाचे आहे. तुम्ही लग्न करुन खूश राहा किंवा एकटे खूश राहा. काही लोक लग्न करुनही दुःखी असतात. तसेच एकटे असले तरी दुःखीच असतात. तुम्ही निवडा तुम्हाला नेमके कसे राहायचे आहे. आनंदी राहणे सगळ्यात महत्त्वाचे आहे”.

हा व्हिडिओ पोस्ट करताना प्राजक्ताने कॅप्शनमध्ये लिहिले, “मला माहित आहे एव्हाना तुम्ही हा व्हिडीओ पाहिला असेल. पण माझ्या गुरुदेवांबरोबरचं पहिलं रेकॉर्ड संभाषण माझ्या प्रोफाइलवर असायलाच हवं ना…मला त्यांनी दिलेलं उत्तर आवडलं. त्यांचं उत्तर मला पटलं. अखिल भारतीय सिंगल संघटना आपल्याला उत्तर मिळालंय”.

प्राजक्ताचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, त्यावर नेटकऱ्यांच्या भानन्ट कमेंट्स येत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॅक टू बॅक फ्लाॅप चित्रपटांवर अखेर अक्षय कुमारने साेडले माैन; म्हणाला, ‘ही माझी चूक…’

‘तारक मेहता’ वयाच्या 42 व्या वर्षी पुन्हा अडकला लग्नबंधनात, इंटिरियर डिझायनर चांदनीसोबत थाटला संसार

 

 

हे देखील वाचा