Latest Posts

‘…नजर लौट के फिर आयेगी!’ लेटेस्ट फोटोद्वारे चाहत्यांना झाले प्राजक्ता माळीच्या उत्तम फॅशन स्टेटमेंटचे दर्शन


प्राजक्ता माळी ही मराठी करमणूक उद्योगातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग असणारी अभिनेत्री, फोटोशूट्सने तिच्या चाहत्यांना आकर्षित करत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर खूपच सक्रिय असून, ती तिच्या उत्कृष्ट फॅशन स्टेटमेंटद्वारे चाहत्यांना प्रभावित करण्याची एकही संधी सोडत नाही. सोशल मीडियावर ती दरदिवशी तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. अशीच तिची एक पोस्ट आता चर्चेचा विषय बनली आहे.

नुकतेच प्राजक्ताने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या उत्तम फॅशन स्टेटमेंटचं दर्शन घडत आहे. यामध्ये तिच्या अदा अगदी पाहण्यासारख्या आहेत. या फोटोत तिने निळ्या ड्रेससह हाय बन बांधला आहे. सोबतच तिने घातलेले हार्ट शेप कानातले तिच्या या ओल्ड स्टायलिश लूकमध्ये आणखी भर घालत आहेत.

हे फोटो शेअर करत प्राजक्ता म्हणतेय की, “जाइये आप कहाँ जायेंगे, यह नजर लौट कर फिर आयेगी.” असे म्हणत अभिनेत्रीने अवघ्या सोशल मीडियाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा अंदाज खूप आवडला आहे. कमेंट्सच्या माध्यमातून तिचे खूप कौतुक केले जात आहे. एका चाहत्याने लिहिले, “कुठे जाऊ, दुसरीकडे बघण्याची संधी मिळत नाही.” तर दुसऱ्याने लिहिलं आहे, “मनमोहक रूप.” सोबतच हार्ट ईमोजीचा पाऊस या फोटोंवर पडलेला पाहायला मिळत आहे. (prajakta mali shared her old fashion stylish look see here)

प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कॉमेडी शो होस्ट करत आहे. यातही तिचा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तसेच तिने काही महिन्यांपूर्वी ‘लकडाउन’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. यात तिच्यासोबत अभिनेता अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. संतोष रामदास मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग जुन्नरमध्ये पार पडले आहे. जो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेता करण कुंद्राची एक्स गर्लफ्रेंड अनुषा दांडेकरच्या बिकिनी फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग

-ज्या काळात वडील समोसा विकायचे, त्या काळातील नेहा-टोनी कक्करचा स्टेजवरील फोटो होतोय व्हायरल

-व्वा! अभिनेत्री वनिता खरातने घेतली पहिली कार, फोटो शेअर करून लिहिले ‘स्वप्नपूर्ती’


Latest Posts

spot_imgspot_img

Don't Miss