ज्या काळात वडील समोसा विकायचे, त्या काळातील नेहा-टोनी कक्करचा स्टेजवरील फोटो होतोय व्हायरल


बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका म्हणजे नेहा कक्कर. नेहा नेहमीच कोणत्या ना कोणत्या सोशल मीडिया पोस्टने चर्चेत असते. तिचे नाव आता संगीत क्षेत्रातील टॉप गायिकांमध्ये सामील झाले आहे. तिचा सोशल मीडियावर देखील जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. आज ती यशाच्या शिखरावर पोहचली आहे. तिच्या या यशामागचे गुपित म्हणजे तिची मेहनत. सुरुवातीला नेहाच्या घरची आर्थिक स्थिती खूप खराब होती, तेव्हा वयाच्या चौथ्या वर्षी तिने गाणे गाण्यास सुरुवात केली होती. या जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देत नेहा कक्करचा भाऊ टोनी कक्कर याने एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. नेहा आणि टोनीचा हा क्यूट फोटो त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे.

टोनी कक्करने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट वरून हा थ्रो बॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये पाहू शकता की, ते दोघे गाताना दिसत आहे. त्या दोघांचाही बॉयकट आहे. तसेच त्या दोघांनीही पँट सूट घातलेला दिसत आहे. या फोटोमध्ये नेहा आणि टोनी खूपच क्यूट दिसत आहेत. हा फोटो शेअर करून टोनी कक्करने एक भावुक कॅप्शन देखील दिले आहे.

त्याने लिहिले आहे की, “जागून काढलेल्या त्रासदायक रात्री.” त्यांचा हा फोटो चाहत्यांना खूपच आवडला आहे. सगळेजण या फोटोवर कमेंट करून त्यांच्या क्यूटनेसचे कौतुक करत आहे. या फोटोवर नेहा कक्करने कमेंट केली आहे. तिने हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे.

अनेक कलाकार देखील त्यांच्या फोटो फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने या फोटोवर प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, “तुम्ही दोघे लहानपणापासूनच स्टार आहात.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “तुमची मेहनतीने आज तुम्हाला फळ दिले आहे.”

लहानपणापासूनच नेहा, टोनी आणि सोनू कक्करने खूप हालाखीचे दिवस काढले आहेत. त्यांचे वडील समोसा विकत असायचे. परंतु त्यांनी खूप कष्ट करून हे यश मिळवले आहे. नेहा आणि टोनीची अनेक गाणी सुपरहिट झाली आहेत. नेहा एका गायिके सोबतच एक उत्तम परफॉर्मर देखील आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्वा! अभिनेत्री वनिता खरातने घेतली पहिली कार, फोटो शेअर करून लिहिले ‘स्वप्नपूर्ती’

-अक्षय कुमारने चित्रपटाची फी कमी केली?? पसरलेल्या या बातम्यांना अभिनेत्याने ‘अशाप्रकारे’ दिले सडेतोड उत्तर

-सुशांतच्या आठवणीत रिया चक्रवर्ती झाली भावुक; म्हणाली, ‘तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही…’


Leave A Reply

Your email address will not be published.