Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

परीची निरागसता अन् नेहाचा समजूतदारपणा, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील बीटीएस व्हिडिओ व्हायरल

मराठी टेलिव्हिजनवर अनेक बालकलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या निरागस आणि गोड अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. मात्र, या वर्षी एका अशा बालकलाकाराची ओळख झाली, जिने मालिकेच्या प्रोमोपासूनच प्रेक्षकांच्या मनात तिचे स्थान निर्माण केले आहे. मालिका सुरू झाल्यापासून तिचे सीन आले की, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच तिचा अभिनय पाहून तिच्या प्रेमात पडतात. ती चिमुकली अभिनेत्री म्हणजे मायरा वैकुळ होय. मायरा सध्या झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत परीच्या भूमिकेत काम करत आहे. या मालिकेत तिच्यासोबत प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदे हे कलाकार काम करत आहेत. मालिकेतील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

मालिकेत प्रार्थना मायराच्या आईच्या भूमिकेत आहे. त्या दोघींची केमिस्ट्री सगळ्यांना खूप आवडते. सेटवरील त्या दोघींचे धमाल व्हिडिओ नेहमीच समोर येत असतात. अशातच नेहा आणि मायराचा सेटवरील एक व्हिडिओ समोर आला आहे. (Prarthana behere and Myra vaikul’s BTS video viral from majhi tujhi reshimgath)

प्रार्थना बेहेरेने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेच्या सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, प्रार्थना हातात कप घेऊन येते आणि खुर्चीवर बसत असते. तितक्यात मायरा तिथे येते आणि म्हणते की, “थांब थांब ही माझी चेअर आहे. तुझी इथे आहे. याच्यावर परी नाव लिहिलं आहे.” यानंतर प्रार्थना शेजारच्या खुर्चीवर बसते आणि म्हणते की, “आई आणि परी.”

हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “नेहा आणि परी हॅप्पी फॅमिली.” तिच्या या व्हिडिओवर ३ लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. अनेकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत एक स्त्री तिच्या पतीशिवाय तिच्या लहान मुलीला कशाप्रकारे वाढवते, हे दाखवले आहे. यात तिला मानसिक तसेच अनेक सामाजिक प्रश्नांना सामोरे जावे लागते, तरी देखील ती एकटी तिच्या मुलीला जॉब करून खूप प्रेमाने वाढवते. अचानक त्यांच्या आयुष्यात एक व्यक्ती येते आणि त्यांचे आयुष्य बदलून टाकते. या लहान मुलीला आणि तिच्या आईला जगण्याचा एक आधार देते ही अत्यंत भावनिक आणि सुंदर कहाणी या मालिकेत दाखवली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘रणवीरचे कपडे घातले का?’, म्हणत एयरपोर्ट लूकवरून दिपीका पदुकोण ट्रोल

-ही प्रेमात बिमात पडली की काय? सुकेश चंद्रशेखरच्या गालावर किस करताना जॅकलिन फर्नांडिसचा फोटो व्हायरल

-‘सध्या बोलू शकत नाही, व्हॉट्सऍप करा’, म्हणणाऱ्या उर्फीच्या फोटोवर युजरची झक्कास कमेंट, एकदा वाचाच

हे देखील वाचा