Tuesday, June 18, 2024

भाई का बड्डे हो गया स्पेशल! प्रथमेश परबने वाढदिवसाच्या दिवशी स्वतःला दिली ‘ही’ महागडी भेट

प्रत्येक व्यक्ती तिच्या आयुष्यात काही स्वप्न बघते. स्वकमाईवर काय काय घ्यायचे आहे, याची एक यादीच प्रत्येकाच्या डोक्यात तयार असते. याच यादीतील काही स्वप्न अशक्य असली तरी मेहनत आणि संघर्षाच्या जोरावर एकना एक दिवस नक्कीच पूर्ण होतात. प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात एक घर आणि एक गाडी घेण्याची प्रचंड इच्छा किंबहुना एक स्वप्नच असते. मात्र ते सर्वांचेच पूर्ण होईल असे नाही. कलाकारांसाठी देखील या दोन गोष्टी घेणे अवघड असते. मात्र हीच किमया करून दाखवली आहे, मराठीमधील लोकप्रिय अभिनेता असलेल्या प्रथमेश परब याने.

नुकताच प्रथमेशने त्याचा २८ वा वाढदिवस साजरा केला. ‘बालक-पालक’ सिनेमातून अभिनयात पदार्पण केलेल्या प्रथमेशने त्याच्या अभिनयाच्या आणि कॉमेडीच्या जोरावर तुफान लोकप्रियता मिळवली. बहुतकरून रोमँटिक भूमिका केलेल्या प्रथमेशने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी स्वतःलाच एक अविस्मरणीय आणि महागडे असे गिफ्ट दिले आहे. प्रथमेशने एक आलिशान गाडी स्वतःला वाढदिवसाच्या दिवशी भेट केली आहे. हो, प्रथमेशने नुकतीच हुंडाईची काळ्या रंगाची ‘क्रेटा’ गाडी स्वतःला गिफ्ट करत त्याचा २८ वा वाढदिवस अधिकच संस्मरणीय केला आहे. या गाडीची किंमत १० लाखांपासून सुरू होऊन १८ लाखांपर्यंत आहे.

प्रथमेशने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रथमेशने गाडी घेतल्याची माहिती दिली आहे. प्रथमेशने गाडीसोबतच स्वतःचा एक फोटो शेअर केला असून, कॅप्शनमध्ये लिहिले, “जोपर्यंत तुम्हाला तुमची पात्रता मिळत नाही तोपर्यंत थांबू नका.” त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रथमेश गाडीसोबत उभा असून, त्याच्या चेहेऱ्यावरचे समाधान आणि आनंद यात स्पष्ट दिसून येत आहे. त्याच्या या पोस्टवर ऋता दुर्गुळे, संदीप पाठक, अक्षय टांकसाळे, सिद्धार्थ जाधव, परी तेलंग, यशोमान आपटे आदी अनेक कलाकारांनी कमेंट करत त्याचे अभिनंदन केले आहे. यासोबतच त्याच्या अनेक फॅन्सने देखील कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही आता प्रियांका चोप्राच्या पतीसोबत लावणार ठुमके, मिळाली ‘ही’ आंतरराष्ट्रीय संधी

-जीवे मारण्याची धमकी मिळताच कंगना रणौतने वादामध्ये ओढलं सोनिया गांधींचं नाव, म्हणाली, ‘जीव देईन, पण…’

-‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ फेम अभिनेत्याने उरकून टाकले लग्न, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला आनंदाचा धक्का!

हे देखील वाचा