Sunday, July 14, 2024

लता मंगेशकर अजूनही आयसीयूत, दिदींसाठी प्रार्थना करण्याचे कुटुंबीयांचे आवाहन | Lata Mangeshkar

गानकोकिळा लता मंगेशकर  (lata mangeshkar) यांची तब्येत मागील अनेक दिवसांपासून खालावली आहे. त्या अनेक दिवसापासून आयसीयूमध्ये आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत. त्या अगदी ठीक आहेत अशा देखील बातम्या आल्या होत्या. परंतु या चुकीच्या बातम्या पसरत आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये अजून काहीही सुधारणा झाली नाही त्या अजूनही आयसीयूमध्ये आहेत, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून आली आहे.

त्यांच्याबाबत चुकीच्या बातम्या पसरत असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी एक आवाहन केले आहे. प्रवक्त्या अनुषा अय्यर यांनी सांगितले आहे की, “दीदी लवकर बऱ्या व्हाव्यात आणि लवकर घरी याव्यात म्हणून यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी सगळ्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.” (Pray for lata mangeshkar, don’t spread fake news her family members told to fans)

लतादीदी यांची तब्येत सुधारणा झाली नसली, तरी देखील त्यांची तब्येत सध्या स्थरी आहेत. परंतु त्या अजूनही आयसीयूमध्ये आहेत. त्यामुळे चुकीच्या बातम्या पसरवू नका असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहेत. त्यांच्या अनेक चाहत्यांना त्यांच्या तब्येतीची काळजी लागून राहिली आहेत.

लता मंगेशकर या एक प्रतिभावान गायिका आहेत. त्यांनी संगीत क्षेत्राला त्यांच्या मधुर आवाजाने एका उच्च स्थरावर नेऊन ठेवले आहे.

हेही वाचा :

कलेक्शन तर तुम्ही खूप पाहिले असतील, पण मलायकाचे ‘हे’ कलेक्शन पाहून तुमचेही डोळे होतील पांढरे

काय सांगता! ‘या’ मराठी अभिनेत्याच्या जीवाला आहे धोका? सोशल मीडियावरील पोस्टमुळे खळबळ

SSR जयंती | आज वाचा सुशांत आणि रिया यांची खरी लव्हस्टोरी, काही गोष्टींची कल्पनाच नसेल

 

हे देखील वाचा