दीपिका पदुकोणने काही दिवसांपुर्वी दुसऱ्यांदा गरोदर असल्याची बातमी शेअर केली होती. हि बातमी समजताच तिच्या चाहत्यांनी रणवीर आणि दिपिकाचे कौतुक केले. ती सध्या प्रसिध्दीपासुन दुर आहे, पण ती सोशल मिडियावर कधीतरी पोस्ट शेअर करते. जसे की तीने काही दिवसांपुर्वी एक गरोदरपणाबद्दल एक अपडेट शेअर केली होती त्या स्टोरी मध्ये तीने गदोरपणातील अडचणी बाबत सांगितले होते. आणि आता पण एक असाच अपडेट करणारा स्टोरी पोस्ट केली आहे.
दीपिका पदुकोणने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पुन्हा पोस्ट केलेल्या या रीलमध्ये असे दिसून येते की, ती गरोदरपणातही आपला सर्व वेळ आपली मुलगी दुआ हिची काळजी घेण्यात घालवत आहे. व्हिडिओमध्ये, एक गर्भवती महिला आपल्या बाळाला कडेवर घेउन काम करत आहे. आणि याला तिने कॅप्शन दिले आहे की, गरोदरपणात 20 पाउंडपेक्षा जास्त वजन उचलु नये मात्र मी हे केल आहे.
दिपिका (deepika)आणि रणवीरला पहिली मुलगी दुआ सप्टेंबर 2024 मध्ये झाली होती आणि आता ते त्यांच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत करणार आहेत. त्यांनी त्यांची मुलगी दुआ हिचा, प्रग्नन्सी किट हातात धरलेला एक गोड फोटो शेअर केला आहे. या गोंडस फोटोसोबतच, दीपिका आणि रणवीरने लवकरच त्यांच्या दुसऱ्या बाळाचे आगमन होणार असल्याची घोषणा केली.
दिपिका पदुकोणच्या कामाबाबत पाहायचे झाल्यास तिचे दोन मोठे प्रोजेक्ट्स रांगेत आहेत. एक म्हणजे किंग आणि दुसरा आहे अल्लू अर्जुनसोबतचा ‘राका’. हा चित्रपट अटली कुमार दिग्दर्शित या चित्रपटात दीपिकाची एक महत्त्वाची भूमिका आहे. आणि अभिनेत्रीने एप्रिलमध्ये एका पोस्टद्वारे या चित्रपटात आपल्या एन्ट्रीची घोषणा केली होती. अलीकडेच, ‘किंग’च्या शूटिंगदरम्यानचा दीपिकाचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये शाहरुख खान तिची काळजी घेताना दिसला.
हेही वाचा
संजय दत्तच्या वाढदिवशी सलमान खानने केली खास पोस्ट शेअर, म्हणाला, ‘बाबा’










