Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

मीरा आणि आदिराजच्या लग्नात येणार विघ्न?, ‘अजूनही बरसात आहे’ मालिकेत अभिनेत्याच्या खऱ्या बायकोची एन्ट्री

आजकाल अनेक मोठे कलाकार छोट्या पडद्यावर पदार्पण करताना दिसत आहेत. प्रेक्षकांचे आवडते कलाकार दररोज त्यांना भेटायला त्यांच्या घरी येतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये देखील आनंदाचे वातावरण असते. अशातच सोनी मराठीवरील ‘अजूनही बरसात आहे’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) आणि उमेश कामत (Umesh Kamat) दिसत आहेत.

प्रेम करणारी दोन माणसे एकेमकांपासून दुरावून अनेक वर्षांनी एकत्र भेटतात, ही सुंदर कहाणी या मालिकेत दाखवली आहे. उमेश आणि मुक्ता यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यांची फॅन फॉलोविंग देखील तेवढी जास्त आहे. त्यामुळे आता त्यांच्या या मालिकेला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला आहे. मालिकेत मीरा आणि आदिराज यांचे लग्न दाखवणार आहेत. (Priya bapat special appearance in ajunahi barasat ahe serial)

अत्यंत जीवापाड प्रेम असणाऱ्या दोन व्यक्तींचे ब्रेकअप होते, परंतु ते कधीच एकमेकांना विसरत नाहीत. त्यांच्या नशिबाने ते पुन्हा भेटतात आणि त्यांच्यातील प्रेम खुलते. त्यांचे लग्न बघण्यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत. त्यांचे लग्न जरी होत असले, तरी या मालिकेत त्यांच्या लग्नात आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री दाखवली जाणार आहे, जिच्यामुळे कदाचित त्यांच्या लग्नात विघ्न येऊ शकते. ती अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट (priya bapat) होय.

प्रिया बापट ही उमेश कामतची वैयक्तिक आयुष्यातील पत्नी आहे. मात्र, या मालिकेत येऊन ती म्हणते की, मी आदिराजची पहिली बायको आहे. मात्र, आता ही कॉमेडी आहे की, खरंच काही विघ्न येणार आहे, हे आता आपल्याला येत्या काही दिवसात समजेलच.

उमेश हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने अनेक मराठी चित्रपटात, मालिकांमध्ये तसेच नाटकात काम केले आहे. त्याने ‘बाळकडू’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘लग्न पहावे करून’ अशा अनेक चित्रपटात काम केले आहे.

तसेच मुक्ताने देखील अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘मुंबई पुणे मुंबई २’, ‘डबल सीट’, ‘हृदयांतर’, ‘जोगवा’, ‘स्माईल प्लीज’, ‘रुद्रम’ या चित्रपटात काम केले आहे. तिची प्रत्येक भूमिका तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-झक्कास! प्राजक्ता माळीने घेतली उंच भरारी; आता ‘या’ क्षेत्रात दाखवणार आपला जलवा

-‘शेवंता’ नाम काफी नहीं होता, म्हणत अपूर्वाने सांगितले ‘रात्रीस खेळ चाले’ सोडण्यामागील कारण

-अखिल भारतीय मराठी सिनेसृष्टीचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, झाली ‘या’ पदावर नेमणूक

हे देखील वाचा