Friday, June 14, 2024

झक्कास! प्राजक्ता माळीने घेतली उंच भरारी; आता ‘या’ क्षेत्रात दाखवणार आपला जलवा

उत्कृष्ट सूत्रसंचालिका, अभिनेत्री आणि आता उत्कृष्ट कवयित्री म्हणून लोकप्रिय असणारी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी होय. अनेक मालिकांमध्ये, चित्रपटात काम केल्यानंतर प्राजक्ताचे अभिनय क्षेत्रात एक वेगळेच स्थान निर्माण झाले आहे. आलेल्या प्रत्येक भूमिकेला तिने न्याय दिला आहे. म्हणूनच ती सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या देखण्या आणि सोज्वळ रूपाचे दर्शन ती तिच्या चाहत्यांना वारंवार देत असते. अशातच तिने तिच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी दिली आहे.

नाही हा! प्राजक्ता लग्न वैगेरे करत नाहीये, तर प्राजक्ताने तिच्या करिअरमध्ये आणखी मोठी भरारी घेतली आहे. तिने निर्मितीविश्वात पदार्पण केले आहे. तिने तिची स्वतःची निर्मिती संस्था चालू केली आहे. याची माहिती तिने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करून दिली आहे. प्राजक्ताने सोशल मीडियावर तिच्या निर्मिती संस्थेचे उद्घाटन होताना फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती श्री. श्री. रवी शंकरजी दिसत आहेत. (Actress prajakta mali open her own film production house, give information on social media)

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “आज गुरूपुष्यामृत- गुरूवार; आणि आजच्या मुहूर्तावर माझ्या गुरूंच्या (गुरू श्री श्री रविशंकरजी) शुभहस्ते माझ्या ‘निर्मिती संस्थेचं’ उद्घाटन करण्यात आलं. ‘शिवोऽहम्’ – Shiivoham Creations Private Limited.
(Finally) त्रिवेणी आश्रम- पुणे इथे हजारोंच्या संख्येत जमलेल्या शिष्यांच्या भाऊगर्दीत मला त्यांना समक्ष भेटता आलं, त्यांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळाल्या. माझं अहोभाग्य (screen वर नाव यायच्या आधीच ते ‘शिवोऽहम्’ म्हणाले आणि आम्ही एकमेकांकडे बघत गोड हसलो. अविस्मरणीय.)”

तिने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकजण प्रतिक्रिया देऊन तिचे कौतुक करत आहेत. या पोस्टवर ऋतुजा बागवे, प्रसाद ओक, दीप्ती देवी, अश्विनी केसकर यांनी कमेंट करून तिचे अभिनंदन करून तिच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेमध्ये काम केले आहे. या मालिकेमधून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील तिच्या साध्या, भोळ्या आणि सालस स्वभावाने सगळ्यांच्या मनावर राज्य केले. तसेच तिने ‘खो-खो’ या चित्रपटात काम केले आहे. ती सध्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे ‘प्राजक्तप्रभा’ हे पुस्तक प्रदर्शित झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘शेवंता’ नाम काफी नहीं होता, म्हणत अपूर्वाने सांगितले ‘रात्रीस खेळ चाले’ सोडण्यामागील कारण

-अखिल भारतीय मराठी सिनेसृष्टीचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, झाली ‘या’ पदावर नेमणूक

-अरे संसार संसार! मानसी नाईक सासरी करतीये चुलीवर चपात्या, व्हिडिओ झाला व्हायरल

हे देखील वाचा