‘मी.. अशी ही..’ ! प्रिया मराठेच पारंपरिक नऊवारी साडीत खुलले सौंदर्य, मोत्याच्या दागिन्यांनी लावले चार चाँद


‘चार दिवस सासूचे‘, ‘कळत- नकळत’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘या सुखांनो या’, ‘तू तिथे मी’, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ आदी मराठी मालिकांसोबतच ‘कसम से’ आणि ‘पवित्र रिश्‍ता’, ‘साथ निभाना साथिया’ या हिंदी मालिकांमुळे घराघरात पोहोचलेले मराठमोळे नाव म्हणजे प्रिया मराठे. प्रियाने ‘या सुखांनो या’ या मालिकेतून तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती.

या मालिकेनंतर तिने अनेक हिंदी मराठी मालिकांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारत प्रेक्षकांच्यामध्ये मोठे स्थान निर्माण केले. प्रिया नेहमी तिच्या भूमिकांमुळे आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. ती नेहमी तिच्या दैनंदिन आयुष्यातील अपडेट सोशल मीडिया शेयर करते, शिवाय तिचे फोटो आणि व्हिडिओ देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात.

नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रियाने नुकतेच तिचे पारंपरिक वेशभूषेतील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. ब्राह्मणी प्रकारच्या पिवळ्या रंगाच्या नऊवारीमध्ये प्रियाचे सौंदर्य खुलून आले आहे. या नऊवार साडीवर तिने घातलेले पारंपारिक मोत्यांचे दागिने तिच्या सौंदर्याला चार चाँद लावत आहे.

‘मी.. अशी ही..’ असे समर्पक शीर्षक देत प्रियाने हे फोटो पोस्ट केले आहे. प्रियाच्या या फोटोला फॅन्सकडून प्रचंड लाइक्स आणि कमेंट्स येत आहेत. प्रियाच्या या फोटोंना फक्त फॅन्स नाही तर कलाकार देखील कमेंट्स करताना दिसत आहे.

‘तू तिथे मी’ या मालिकेत प्रिया निगेटिव्ह भूमिकेत दिसली. तिची ही भूमिका प्रचंड गाजली. सोबतच कसम से, या मालिकेतून तिने हिंदी मालिकांमध्ये प्रवेश केला. प्रियाला हिंदीमध्ये खरी ओळख मिळाली ती ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत साकारलेल्या तिच्या ‘वर्षा’ या भूमिकेमुळे. याशिवाय तिने ‘बडे अच्छे लगते’ है, कॉमेडी सर्कस, आयुष्मान भव:, भागे रे मन, आदी अनेक सिरियलमध्ये प्रिया झळकली.

हेही वाचा-

प्रिया बापट आणि उमेश कामतचा गोड फोटो होतोय चाहत्यांच्या चर्चेचा विषय, पाहा तो फोटो

नववधू मानसी नाईकचे नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाजात फोटोशूट, चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस

अभिनेत्री मिताली मयेकरच्या बाथटबमधील फोटोंनी सोशल मीडियावर घातलाय राडा..राडा!!

 

 

 


Leave A Reply

Your email address will not be published.