अभिनेत्री मिताली मयेकरच्या बाथटबमधील फोटोंनी सोशल मीडियावर घातलाय राडा..राडा!!

Marathi Actress Mitali Mayekar Shared Photo Bathtub And Caused Stir Social Media


अभिनय असो किंवा गायन, मराठी कलाकार सर्वत्र आघाडीवर असतात. असेच काहीसे सोशल मीडियाच्या बाबतीतही आहे. मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकरचा सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये समावेश होतो. तिने अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत काही दिवसांपूर्वी लग्नगाठ बांधत आपला संसार मोठ्या उत्साहात थाटला होता. परंतु आता लग्नाच्या अनेक दिवसांनंतरही या जोडप्याचे फोटो व्हायरल होत आहेत. अशातच मितालीचा बाथटबमधील फोटो सोशल मीडियावर चांगलाच राडा घालत आहेत.

मितालीने नुकताच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर बाथटबमधील फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत तिने ‘बबली ब्लँकेट’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

खरं तर हे फोटो मिताली आणि सिद्धार्थच्या लग्नानंतरचे आहेत. हे जोडपं लग्नानंतर लोणावळा येथील मचान रिसॉर्टवर सोबत वेळ घालवण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी तिथे एन्जॉय केला. मितालीनेही तिथे वेगवेगळे पोज देत भन्नाट फोटो काढले होते.

यावेळी दोघांचा किस करतानाचाही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता.

मिताली आणि सिद्धार्थ यांचा पुण्यातील ढेपे वाड्यात थाटामाटात लग्नसोहळा पार पडला होता. त्यांनी पारंपारिक पद्धतीने लग्न केले होते. या लग्नात मिताली हिरव्या रंगाच्या नऊवारी साडीत दिसली होती. नाकात नथ, हिरवा चुडा, माथ्यावर बाशिंगमध्ये तिचे रूप खुलून दिसत होते.

मिताली आणि सिद्धार्थ हे लग्नाच्या २ वर्षांपूर्वीपासून एकमेकांना डेट करत होते. एकमेकांसोबत चांगला वेळ घालवल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

मितालीने सन २००९ मध्ये ‘बिल्लू’ या चित्रपटातून अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘उर्फी’, ‘यारी दोस्ती’ यांसारख्या चित्रपटात काम केले. याव्यतिरिक्त तिने ‘असंभव’, ‘उंच माझा झोका’ यांसारख्या कार्यक्रमांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिद्धार्थ- मितालीचे लोणावळ्यातील रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल; एकदा पाहाच

-‘पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यावरती’, मराठमोळ्या अंदाजातील फोटो शेअर करत सोनालीने दिले भन्नाट कॅप्शन, चाहतेही झाले फिदा

-संस्कृतीची बातच न्यारी! पुण्याच्या मराठमोळ्या अभिनेत्रीचे साडीतील फोटो व्हायरल; पाहून तुम्हीही पडाल प्रेमात


Leave A Reply

Your email address will not be published.