Thursday, April 18, 2024

भारतात आल्यावर पती आणि लेक मालतीसोबत प्रियांका चोप्राने लुटला होळीचा आनंद, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या भारतात आहे. सोमवारी होळीच्या पार्टीदरम्यान प्रियंका तिच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत मस्ती करताना दिसली. यावेळी प्रियंकासोबत तिचा पती निक जोनासही दिसला. पार्टीदरम्यान प्रियांकाने मुलगी मालतीसोबतचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते जे व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये प्रियंका मुलगी मालतीला घेऊन होळी एन्जॉय करताना दिसली आहे. त्याचवेळी मालती देखील कॅमेऱ्यासमोर अतिशय सुंदर पोज देताना दिसत आहे, तर या फोटोमध्ये निक तिच्या मागे उभा असल्याचे दिसत आहे. या फोटोंमध्ये, प्रियांका तिच्या कुटुंबीयांसह आणि जवळच्या मित्रांसह दिसत आहे, जी पूर्णपणे होळीच्या रंगात सजलेली दिसत आहे.

होळीच्या पार्टीमध्ये प्रियंका पांढऱ्या चुरीदार सूटमध्ये दिसली होती. त्याचवेळी निक जोनसही पांढऱ्या कुर्ता पायजमामध्ये दिसत आहे. प्रियांकाने हे फोटो इंस्टाग्रामवर चाहत्यांसह शेअर केले, जे काही वेळातच व्हायरल झाले.

सध्या प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री आजकाल अनेक चित्रपट निर्मात्यांना भेटत आहे आणि अनेक स्क्रिप्ट वाचत आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, सध्या प्रियांका संजय लीला भन्साळी यांच्यासोबत एका चित्रपटाची चर्चा करत आहे. यासंबंधीची माहिती लवकरच समोर येईल.

याशिवाय प्रियांका ‘जी ले जरा’ या चित्रपटातही दिसणार आहे. फरहान अख्तर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे, ज्यामध्ये प्रियंकासोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या फरहान ‘डॉन 3’च्या तयारीत व्यस्त आहे. यानंतर जी ले जरा या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

कुटुंबासह दुबईला रवाना झाला अल्लू अर्जुन, त्याच्याच मेणाच्या पुतळ्याचे करणार अनावरण
लोकसभा निवडणूक लढण्यापूर्वी भावूक झाली कंगना; म्हणाली, ‘मातृभूमीची सेवा करणे हे माझे भाग्य आहे’

हे देखील वाचा