Tuesday, July 1, 2025
Home बॉलीवूड फोटो शेअर करून प्रियांका चोप्राने सासूला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; पाहायला मिळाला सासू-सूनेचा हटका अंदाज

फोटो शेअर करून प्रियांका चोप्राने सासूला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; पाहायला मिळाला सासू-सूनेचा हटका अंदाज

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राने २०१८ साली अमेरिकन सिंगर निक जोनास याच्याशी लग्न केले आहे. लग्नानंतर प्रियांकाने तिच्या कुटुंबासोबत अनेक फोटो शेअर केले आहेत. आज प्रियांकाची सासू डेनिस जोनास हिचा वाढदिवस आहे. प्रियांकाने तिच्या सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिचे तिच्या सासूसोबतचे बॉंडिंग दिसत आहे. (Priyanka Chopra give birthday wishesh to her mother in law with sharing photo)

प्रियांका चोप्राने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या सासूसोबतचा हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आयुष्यात असल्यामुळे मी धन्य झाले आहे. तुम्हाला खूप प्रेम आणि शुभेच्छा. तुमची खूप आठवण येते. आपण अजून एकत्र फोटो काढले पाहिजे.” या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रियांका चोप्रा तिच्या सासूसोबत मस्ती करताना आणि क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे. सासू-सूनेचा हा हटके अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. सगळेजण या फोटोवर कमेंट करून तिच्या सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

यासोबतच निक जोनासने देखील त्याच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने त्याच्या आईसोबतचा एक फोटो इंस्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे. तसेच त्याने लिहिले आहे की, “हॅप्पी बर्थडे मॉम, लव्ह यू.”

प्रियांका चोप्रा ही कामाबाबत खूप परफेक्ट आहे. पण यामुळे ती तिच्या कुटुंबाकडे कधीही दुर्लक्ष होऊ देत नाही. ती तिच्या कुटुंबाला खूप वेळ देत असते. घरात सगळ्यांशी तिचा खूप चांगला बाँड आहे. तिने या आधी देखील कुटुंबीयांसोबत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-क्रिती सेननच्या ‘मिमी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ; प्रेक्षकांकडून मिळतोय तूफान प्रतिसाद

-महाराष्ट्रातल्या मातीतला एक खलनायकी अन् रांगडा चेहरा ‘निळू फुले’; उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर गाजवलीत त्यांनी चार दशकं

-‘जाने क्या बात है!’ अन्विताने शेअर केला ‘ओम-स्वीटू’चा रोमँटिक फोटो; चाहत्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा

हे देखील वाचा