Monday, July 1, 2024

पहिल्यांदाच आपल्या रेस्टॉरंट ‘सोना’मध्ये गेली प्रियांका चोप्रा; पाणीपुरीचा आस्वाद घेतानाचा फोटो व्हायरल

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने तिच्या अभिनयाचा डंका हॉलिवूडपर्यंत गाजवला आहे. हॉलिवूडमध्ये देखील तिने तिच्या मेहनतीने चांगले नाव कमावले आहे. तसेच प्रियांकाने परदेशात तिचा एक नवीन व्यवसाय देखील चालू केला आहे. तिने न्यूयार्कमध्ये भारतीय रेस्टॉरंट चालू केले आहे. ज्याचे नाव तिने ‘सोना’ असे ठेवले आहे. परदेशात भारतीय चव आणि संस्कृतीचे जतन करून ते वाढवण्याचा प्रयत्न केल्याने तिचे सर्वत्र खूप कौतुक झाले आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी प्रियांका पहिल्यांदा तिच्या रेस्टॉरंटमध्ये गेली. तेव्हा ती तिथे जेवणाचा आनंद घेताना दिसली.

प्रियांकाने सोना रेस्टॉरंटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोमध्ये ती भारतीय पदार्थांचा आनंद घेताना दिसली होती. प्रियांका मागील काही दिवसांपासून तिच्या आगामी वेब सीरिजची शूटिंग लंडनमध्ये करत होती. आता काही दिवसांपूर्वी ती अमेरिकेला परत गेली आहे. आता ती तिच्या रेस्टॉरंटमध्ये आली आहे. तिथे तिने डोसा आणि पाणीपुरी खाण्याचा संपूर्ण आनंद घेतला आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंना चाहते मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवत आहेत.

 

हे फोटो शेअर करून प्रियांकाने लिहिले की, “मला विश्वास बसत नाही की, मी न्यूयार्कमध्ये आले आहे आणि माझ्या तीन वर्षाच्या मेहनतीला माझ्या डोळ्यांनी बघत आहे. किचनमध्ये गेल्यावर त्या टीमला भेटून मला खूप आनंद झाला, ज्यांनी ‘सोना’ हा एक चांगला अनुभव बनवला आहे. माझ्या नावावर बनवलेला प्रायव्हेट डायनिंग रूम, सुंदर इंटेरियर, भारतीय कलाकारांची उत्कृष्ट कला या सगळ्या गोष्टींनी सोनाचा अनुभव खूप सुंदर केला आहे.” (Priyanka Chopra share her new yark restaurant sona’s photo on social media)

जेव्हा या रेस्टॉरंटचे उद्घाटन झाले होते, तेव्हा प्रियांकाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यामध्ये अनेक ठिकाणची दृश्ये तिने दाखवली होती. तसेच अनेक पदार्थांची झलक देखील तिने दाखवली होती. या रेस्टॉरंटमध्ये भारतातील अनेक प्रसिद्ध पदार्थ उपलब्ध आहेत. इथे दक्षिणपासून ते उत्तर भारतापर्यंतचे सगळे लोकप्रिय पदार्थ उपलब्ध आहेत.

तिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, शेवटची ‘द : व्हाइट टायगर’ या चित्रपटात दिसली होती. ती स्वतःच या चित्रपटाची निर्माती आहे. प्रियांका हॉलिवूडच्या ‘टेक्स्ट फॉर यू’ आणि ‘मॅट्रिक्स 4’ या चित्रपटात दिसणार आहे. बॉलिवूडमध्ये ती शेवटची फहरान अख्तरसोबत ‘स्काय इज पिंक’ या चित्रपटात दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आनंदाची बातमी! ‘खिलाडी’ अक्षय कुमारने केली नवीन मोबाईल गेमची घोषणा; सोशल मीडियावरून दिली माहिती

-‘ओ पिया’, म्हणत ‘शालू’ने शेअर केला व्हिडिओ; काळ्या साडीमध्ये पाहायला मिळाल्या वेड लावणाऱ्या अदा

-हॉट व्हिडिओ शेअर करत मराठमोळी ऋतुजा बागवे म्हणतेय, ‘…माझ्यात तो टॅलेंट नाही’

हे देखील वाचा