बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत जिने नाव कमवले आहे, ती अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. (Priyanka Chopra) तिची ओळख आज एक ग्लोबल स्टार म्हणून आहे. आज तिला कोणाच्याही ओळखीची गरज नाही. तिने स्वतःच्या कष्टाने तिचे नाव कमावले आहे. सुरुवातीला तिला तिच्या रंगावरून हिणवले जात होते. परंतु या सगळ्या गोष्टींवर मात करत तिने टॅलेंटच्या जोरावर लोकप्रियता मिळवली आहे. तिला इतर कोणच्याही नावाने ओळखलेले आवडत नाही. अशातच माध्यमातील एका वृत्तात तिचा उल्लेख निक जोनासची (Nick Jonas) पत्नी असा केला आहे, हे तिला अजिबात आवडले नाही.
प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून एक स्क्रीनशॉट शेअर करून ही माहिती दिली आहे. तिने हा स्क्रीनशॉट शेअर करून प्रश्न विचारला आहे की, “मला आता आयएमडीबी लिंक जोडावी लागणार आहे का?” तिने याबाबत सोशल मीडियावर स्पष्टीकरण देखील मागितले आहे. तसेच तिचे असे म्हणणे आहे की, हे असे कोणत्याही महिलेसोबत घडू शकते. (priyanka chopra slams report calling her wife of nick jonas, share post on social media)

तिने हा स्क्रीनशॉट शेअर करून लिहिले आहे की, “ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की, मी आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट फ्रेंचाइजीचे प्रमोशन करत आहे आणि मला कोणाचीतरी पत्नी असे म्हटले जात आहे.” या फोटोत तिने हे देखील म्हटले आहे की, “कृपया मला हे सांगा की, अजूनही या गोष्टी महिलांसोबत कशा काय होतात. मी आता माझ्या बायोमध्ये आयएमडीबी लिंक टाकावी लागेल का?” या पोस्टमध्ये तिने तिचा पती निक जोनास याला देखील मेन्शन केले आहे.
प्रियांका चोप्राचे वैयक्तिक आयुष्य कितीही चर्चेत असले, तरी देखील या गोष्टीचा परिणाम तिने तिच्या व्यावसायिक आयुष्यावर होऊन दिला नाही. तिने तिच्या आयुष्यात यशाची एक एक सीडी चढत प्रगतीच केली आहे. ती सध्या तिच्या अनेक प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. ती अनके प्रोजेक्टचे प्रमोशन देखील करत आहे. ती ‘द मॅट्रिक्स रेसरेक्शनमध्ये ‘किनु रिव्ह्यू’, ‘कॅरी एनी मॉस’, ‘जैदा’, ‘निल पॅट्रिक हॅरिस’ यांसारख्या प्रोजेक्टमध्ये आगामी काळात दिसणार आहे.
हेही वाचा :
‘ही’ बॉलिवूड मंडळी आहे जॉन अब्राहमची कट्टर दुश्मन, एकाने तर केलाय करिअर संपवण्याचा प्रयत्न
रवीना टंडनला देखील झाला सारासोबत ‘चका चक’ गाण्यावर थिरकायचा मोह, पाहा त्यांच्या डान्सचा व्हिडिओ