Thursday, December 4, 2025
Home साऊथ सिनेमा शेवटचे मोठ्या पडद्यावर दिसणार दिवंगत पुनीत राजकुमार, जाणून घ्या कधी रिलीझ होणार ‘गंधदागुड़ी’

शेवटचे मोठ्या पडद्यावर दिसणार दिवंगत पुनीत राजकुमार, जाणून घ्या कधी रिलीझ होणार ‘गंधदागुड़ी’

सुपरस्टार पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) यांचे गेल्या वर्षी निधन झाले. आता त्यांची पत्नी अश्विनी पुनीत कुमारने सोशल मीडियावर माहिती दिली आहे की, पुनीत राजकुमारचा शेवटचा चित्रपट ‘गंधदागुड़ी’ त्यांच्या पुण्यतिथीच्या एक दिवस आधी प्रदर्शित होणार आहे. पुनीत राजकुमार यांचे गेल्या वर्षी वयाच्या ४६व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर जवळपास एक वर्षानंतर हा सिनेमा रिलीझ होणार आहे. या सिनेमात पुनीत त्याच्याच भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २८ ऑक्टोबरला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याची माहिती त्यांच्या पत्नीने ट्विटरवरून दिली आहे.

पुनीत राजकुमार यांना अप्पू या नावानेही ओळखले जाते. त्यांनी कन्नड चित्रपटसृष्टीतील अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या वर्षी वयाच्या ४६व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. आता त्यांच्या पत्नीने या चित्रपटाबद्दल ट्विटरवर पोस्ट केली आहे. यामध्ये पुनीत आणि वाइल्डलाइफ फोटोग्राफर अमोघवर्षा दिसत आहेत. ट्वीटमध्ये तिने लिहिलंय की, “अप्पूचा शेवटचा चित्रपट, ज्यामध्ये तो स्वतः बद्दल बोलणार आहे. कर्नाटकचे अद्भुत जग दाखवणार आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी एक प्रेमळ भेट, ज्यांनी त्याच्यावर खूप प्रेम केले. हा चित्रपट २८ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.” (puneeth rajkumar last film gandhadagudi release date)

विशेष म्हणजे, पुनीत राजकुमारच्या पुण्यतिथीच्या एक दिवस आधी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती अश्विनी पुनीत कुमारने केली आहे. तर अमोघवर्षा देखील चित्रपटात दिसणार आहे. हा एक नॉन फिक्शन चित्रपट असेल. पुनीतचा हा शेवटचा चित्रपट असेल. २००२ मध्ये ‘अप्पू’ या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले होते. यामुळे त्यांना हे लोकप्रिय टोपणनाव देखील मिळाले.

पुनीत राजकुमारने गेल्या २ दशकात अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. त्यामुळे ते कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कलाकार म्हणून उदयास आले आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झालेला ‘जेम्स’ हा चित्रपट कर्नाटक चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा