Wednesday, June 26, 2024

रश्मीकाच्या वाढदिवशी चाहत्यांना खास भेट, ‘द गर्लफ्रेंड’मधील अभिनेत्रीचा पहिला लूक समोर

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) आज 5 एप्रिल रोजी तिचा 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक खास भेट मिळत आहे. सध्या रश्मिका तिचा आगामी चित्रपट ‘द गर्लफ्रेंड’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आता निर्मात्यांनी अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटातील रश्मिकाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. आता ‘द गर्लफ्रेंड’ मधील रश्मिकाची पहिली झलक पाहिल्यानंतर चाहते खूपच उत्साहित झाले आहेत.

चित्रपटाची निर्मिती कंपनी गीता आर्ट्सने त्यांच्या अधिकृत X खात्यावर अभिनेत्रीचे दोन लूक पोस्टर शेअर केले आहेत. पोस्टरचा लूक पाहता रश्मिका या चित्रपटात महाविद्यालयीन विद्यार्थिनीची भूमिका साकारत असल्याचे दिसते. एका पोस्टरमध्ये ती लाजाळू तर दुसऱ्या पोस्टरमध्ये ती विचारात हरवलेली दिसते.

पोस्टरसोबतच निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तिचे डोळे हसण्याआधी हसतात आणि ते बोलणार नाहीत असे शब्द बोलतात. ‘द गर्लफ्रेंड’ सादर करत आहे. सदैव आनंदी राहणाऱ्या रश्मिका मंदान्ना या राष्ट्रीय क्रशला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कॉलेजच्या सेटअपमध्ये सलवार कुर्ता सेटमध्ये रश्मिका लाजाळू दिसत होती.

23 ऑक्टोबर रोजी तिच्या 24व्या चित्रपटाची घोषणा करताना रश्मिका मंदान्नाने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘जग हे महान प्रेमकथांनी भरलेले आहे, परंतु काही प्रेमकथा अशा आहेत ज्या यापूर्वी कधीही ऐकल्या नाहीत आणि पाहिल्याही नाहीत. ‘द गर्लफ्रेंड’ हा असाच एक चित्रपट आहे. दरम्यान, रश्मिका मंदान्ना तिचा २८ वा वाढदिवस यूएईमध्ये साजरा करत आहे. या व्हेकेशनमध्ये तिचा कथित बॉयफ्रेंड विजय देवरकोंडाही तिच्यासोबत आल्याचे सांगण्यात येत आहे.

अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर रश्मिका मंदान्ना हिचे अनेक चित्रपट रांगेत आहेत. ती ‘रेनबो’, ‘डी51’, ‘छावा’, ‘पुष्पा 2’ आणि रवी तेजासोबत एका चित्रपटात दिसणार आहे. ‘पुष्पा 2’ मधील ‘श्रीवल्ली’ या अभिनेत्रीचा लूकही तिच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित करण्यात आला. पोस्टरमध्ये अभिनेत्री साडी नेसून केसांना सिंदूर लावताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘लव्ह अँड वॉर’चे नवीन अपडेट समोर, असे असणार आलिया भट्टचे पात्र
विजय-मृणालच्या ‘द फॅमिली स्टार’ चित्रपटाला मिळाले U/A प्रमाणपत्र, हे सीन्स करण्यात आले कट

हे देखील वाचा