संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या लव्ह अँड वॉर या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
लव्ह आणि वॉरच्या सततच्या चर्चेदरम्यान या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. एका ताज्या रिपोर्टनुसार, आलिया भट्ट या चित्रपटात जॅझ सिंगरच्या भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिन्ही कलाकारांची पात्रं चित्रपटात गुंतागुंतीच्या परिस्थितीशी झुंजताना दिसणार आहेत. मात्र, या दोन्ही कलाकारांच्या व्यक्तिरेखेबाबत अहवालात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, आलिया हे पात्र साकारण्यासाठी खूप उत्सुक आहे, कारण तिने याआधीही तिच्या चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. असे म्हटले जात आहे की तिनेआतापर्यंत साकारलेल्या सर्वात गुंतागुंतीच्या पात्रांपैकी हे एक असू शकते. रिपोर्टनुसार, चित्रपटाची तयारी सुरू झाली असून नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यापासून त्याचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर तो रिलीज होणार आहे.
आलियाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘जिगरा’मध्ये दिसणार आहे. तिने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. याचे दिग्दर्शन वासन बाला यांनी केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत वेदांग रैना दिसणार आहे. याशिवाय ती YRF च्या Spy Universe मध्ये देखील दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
घरच्यांच्या विरोधाला न जुमानता रश्मीका मंदानाने केला चित्रपटात प्रवेश, असा आहे तिचा जीवनप्रवास
रणदीप हुड्डाचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘कंगनाने विनाकारण आलियाला टार्गेट केलं होतं’